शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

खांबात विद्युत प्रवाह उतरला, याला जबाबदार कोण? जाब विचारत सरपंचास बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:25 IST

ही धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातील शेडोळवाडी येथील आहे. निलंगा पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

निलंगा (जि. लातूर) : गावातीलच काही तरुणांनी ग्रामपंचायतमध्ये घुसून सरपंचाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातील शेडोळवाडी येथील आहे. माझ्या दारात महावितरणचा पोल का लावला म्हणून सरपंचास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना वाडीशेडोळ (ता. निलंगा) येथे घडली. याप्रकरणी शनिवारी निलंगा पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सरपंच शेख रुबाब आणि ग्रामसेवक पाटील एन. एस. यांनी निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ग्रामपंचायत मध्ये घुसून सरपंचाला मारहाण करत संगणक, वायफाय आणि इतर साहित्याची तोडफोड करत शासकीय कामात अडथळा आणल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले, वाडीशेडोळ येथील सरपंच रुबाब शेख व ग्रामसेवक सीमा माळी हे १६ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीसाठी बसले होते. यावेळी बासिद पठाण व वाजिद पठाण हे दोघे कार्यालयात आले आणि आमच्या दारात विजेचा पोल रोऊ नका, असे म्हणाले. हा विषय महावितरण कार्यालयांतर्गत येतो, त्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही, असे सरपंच रुबाब शेख यांनी म्हणताच त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक, वायफाय बॅटरी, प्रिंटरची तोडफोड करण्यात आली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सरपंच, ग्रामसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सरपंच रुबाब चाँदसाब शेख यांनी निलंगा पोलिस ठाणे येथे शनिवारी दुपारी दिलेल्या तक्रारीवरून बासिद महबूब पठाण, वाजीद महबूब पठाण, महबूब शब्बीर पठाण या तिघांविरुद्ध धमकी, मारहाण व शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ राम गोमारे करत आहेत.

टॅग्स :laturलातूरgram panchayatग्राम पंचायतCrime Newsगुन्हेगारी