जळकोटात आजपासून गावकारभाऱ्यांच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST2021-02-06T04:34:00+5:302021-02-06T04:34:00+5:30

तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले आणि १८ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. २९ रोजी सरपंच पदाच्या ...

Elections of villagers in Jalkot from today | जळकोटात आजपासून गावकारभाऱ्यांच्या निवडी

जळकोटात आजपासून गावकारभाऱ्यांच्या निवडी

तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले आणि १८ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. २९ रोजी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यामुळे निवडणूक झालेल्या गावांत सरपंचपदाकडे लक्ष लागून आहे. शुक्रवारपासून सरपंच पदाच्या निवडी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी दिली.

शुक्रवारी घोणसी, तिरुका, रावणकोळा, सोनवळा, येलदरा, गव्हाण, सुल्लाळी, घोणसी, सोनवळा, धामणगाव, शनिवारी अतनूर, चिंचोली, डोंगरगाव, बोरगाव खु., वांजरवाडा, कोनाळी डोंगर, कोळनूर, लाळी बु., कुणकी, १० फेब्रुवारी रोजी मेवापूर, मरसांगवी, शिवाजी नगरतांडा, एकुर्गा खु., वडगाव, पाटोदा खु., हळद वाढवणा, विराळ, १२ फेब्रुवारी रोजी शेलदरा येथील सरपंचाची निवड केली जाणार आहे.

सरपंच, उपसरपंच निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून एस.एस. येमपल्ले, एस.व्ही. काडवादे, व्ही.के. हांडे, पी.एस. शिंदे, आय.जे. गोलंदाज, जी.ए. त्रिपती, ए.आर. मारमवार, बी.ए. चिंचोले, एन.एस. बोरकर यांची

नियुक्ती करण्यात आली आहे.

गावांना मिळणार नवे कारभारी...

निवडणूक विभागाने सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीच्या तारखा जाहीर केल्याने लवकरच ग्रामपंचायतींना नवे कारभारी मिळणार आहेत. दरम्यान, काही गावांत चुरशीच्या लढती झाल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणचे नूतन ग्रामपंचायत सदस्य सहलीवर गेले आहेत. घोणसी, वांजरवाडा, बोरगाव, अतनूर, शिवाजीनगर तांडा, रावणकोळा, सुल्हाळी, डोंगर कोनाळी येथे चुरशीच्या लढती झाल्याने ग्रामपंचायतीचा नवा कारभारी कोण राहणार, याची उत्सुकता लागली आहे.

Web Title: Elections of villagers in Jalkot from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.