सहा ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचाची निवड बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST2021-02-06T04:34:38+5:302021-02-06T04:34:38+5:30
शुक्रवारी झालेल्या सहा ग्रामपंचायतींच्या सरपंच,उपसरपंच निवडी पुढीलप्रमाणे आहेत. तालुक्यातील हंचनाळ येथे सरपंचपदी जानकाबाई सुधाकर सूर्यवंशी तर उपसरपंचपदी राजकुमार गोविंदराव ...

सहा ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचाची निवड बिनविरोध
शुक्रवारी झालेल्या सहा ग्रामपंचायतींच्या सरपंच,उपसरपंच निवडी पुढीलप्रमाणे आहेत. तालुक्यातील हंचनाळ येथे सरपंचपदी जानकाबाई सुधाकर सूर्यवंशी तर उपसरपंचपदी राजकुमार गोविंदराव बिरादार यांची बिनविरोध निवड करण्यात आली, अजनीच्या सरपंचपदी रायाबाई दामोधर बिरादार तर उपसरपंचपदी गजानन जनार्धन गायकवाड यांची बहुमताने निवड करण्यात आली. होनाळी येथील सरपंचपदी सतीश गणपतराव बिरादार तर उपसरपंचपदी औदुंबर रामराव पांचाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर कमालवाडी येथे उपसरपंचपदी लताबाई रामचंद्र येरमे यांची निवड झाली आहे. नेकनाळ येथे सरपंचपदी कलावती उमाकांत कोरे तर उपसरपंचपदी अमोल शिवशंकर पाटील यांची निवड करण्यात आली. विळेगाव येथे सरपंचपदी नरसाबाई दत्तात्रय रणदिवे यांची निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी अंजली अजित बेळकोणे यांची निवड करण्यात आली. या निवडप्रक्रियेचे अध्यासी अधिकारी म्हणून अशोक कट्टेवार, गणेश गोपनवाड, बालाजी केदासे, सूर्यकांत येडले, राजकुमार अलापुरे, सूर्यकांत तांदळे यांनी काम पाहिले. तर त्यांना त्या-त्या गावचे तलाठी, ग्रामसेवक यांनी सहकार्य केले. या निवडीनंतर त्या-त्या गावात नूतन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो ओळी...
१ नरसाबाई दत्तात्र्यय रणदिवे सरपंच, विळेगाव २. अंजली अजित बेळकोणे उपसरपंच, विळेगाव ३. सतीश गणपतराव बिरादार सरपंच, होनाळी ४. औदुंबर रामराव पांचाळ उपसरपंच, होनाळी ५. कलावती उमाकांत कोरे सरपंच, नेकनाळ ६. अमोल शिवशंकर पाटील उपसरपंच, नेकनाळ ७. लताबाई रामचंद्र येरमे उपसरपंच, कमालवाडी ८. जानकाबाई सुधाकर सूर्यवंशी सरपंच, हंचनाळ ९. राजकुमार गोविंदराव बिरादार उपसरपंच, हंचनाळ