४ फेब्रुवारीपासून सरपंचांच्या निवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:04+5:302021-02-05T06:23:04+5:30
तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. त्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. आता ४,८,९, १० व ११ फेब्रुवारीदरम्यान ...

४ फेब्रुवारीपासून सरपंचांच्या निवडी
तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. त्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. आता ४,८,९, १० व ११ फेब्रुवारीदरम्यान सरपंचांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी विस्तार अधिकारी गोविंद काळे, एन. बी. कुमठेकर, राठोड, एस .एन. नरहरे, केंद्रप्रमुख यु. जी. पुरी, कृषी पर्यवेक्षक के.आर. पौळ, शाखा अभियंता व्ही.व्ही. कुलकर्णी, पी .टी. येलाले, विस्तार अधिकारी एम.एस. शेख यांची अध्याशी अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.
४ फेब्रुवारी रोजी खरोळा, सिंधगाव, माकेगाव, पळशी, खलंग्री, ५ फेब्रुवारी रोजी व्हटी- सायगाव, पाथरवाडी, गव्हाण, वंजारवाडी, खानापूर, ८ फेब्रुवारी रोजी दिवेगाव, भंडारवाडी, आंदलगाव, फावडेवाडी, ९ फेब्रुवारी रोजी आनंदवाडी, मुसळेवाडी, दवणगाव, सारोळा, बिटरगाव, १० फेब्रुवारी रोजी फरदपुर, तत्तापूर, तळणी तर ११ फेब्रुवारी रोजी कुंभारी, वाला, कुंभारवाडी, मोरवड व बावची येथील सरपंचांच्या निवडी होणार आहेत.