जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर (फक्त सीडीसाठी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:35 IST2020-12-15T04:35:56+5:302020-12-15T04:35:56+5:30
लातूर-उदगीरमधील सर्वाधिक ग्रामपंचायती... ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लातूर तालुक्यातील ६४, रेणापूर २८, औसा ४६, निलंगा ४८, शिरूर अनंतपाळ २७, देवणी ...

जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर (फक्त सीडीसाठी)
लातूर-उदगीरमधील सर्वाधिक ग्रामपंचायती...
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लातूर तालुक्यातील ६४, रेणापूर २८, औसा ४६, निलंगा ४८, शिरूर अनंतपाळ २७, देवणी ३४, उदगीर ६१, जळकोट २७, अहमदपूर ४९, तर चाकूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये लातूर आणि उदगीर तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत. यासाठी १ हजार ३४१ प्रभाग आहेत.
१ हजार ४३२ केंद्रांवर मतदान...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६ लाख ७२ हजार ६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी मतदान केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये लातूर तालुक्यातील २३२, रेणापूर ८६, औसा १७४, निलंगा १८०, शिरूर अनंतपाळ ८६, देवणी १०८, उदगीर २२५, जळकोट ८४, अहमदपूर १५५ तर चाकूर तालुक्यातील १०२ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या निवडणुकीत ३ लाख ५६ हजार ५२५ पुरुष, ३ लाख १५ हजार ५४३ महिला मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.