प्रा. रामदास केदार यांना साहित्य ॲकॅडमीचा पुरस्कार.
उदगीर : लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य ॲकॅडमीतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय प्रथम पुरस्कार साहित्यिक तथा मराठी चित्रपट गीतकार प्रा. रामदास केदार यांना जाहीर झाला आहे. या यशाबद्दल संस्था सचिव चंदन पाटील, प्राचार्य वाय.के. मुुंजेवार, अध्यक्ष ॲड. एस.एस. बोडके, सचिव प्रकाश घादगिने, बंकट पुरी, डॉ. संजय जमदाडे, साहित्यिक संजय ऐलवाड, रसूल पठाण, लक्ष्मण बेंबडे, विक्रम हलकीकर, सिद्धार्थ सूर्यवंशी, अनंत कदम, अंकुश सिंदगीकर, सतीश नाईकवाडे आदींनी कौतुक केले आहे.
लालबहादुर शास्त्री विद्यालयाचे तीन विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर
उदगीर : येथील लालबहादुर शास्त्री विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी निवड झाली आहे. यामध्ये अभिषेक सोमेश्वर पाटील, यशश्री सायराम श्रीगिरे, समर्थ बालाजी पत्तेवार यांचा समावेश आहे. यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह नितीन शेटे, मधुकरराव वट्टमवार, शंकरराव लासुणे, व्यंकटराव गुरमे, मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, अंबादासराव गायकवाड, पर्यवेक्षक अंबुताई दीक्षित, लालासाहेब गुळभिले, भास्करराव डोंगरे आदींनी कौतुक केले आहे.
अंधोरी परिसरातील नागरिकांचे निवेदन
अंधोरी : अहमदपूर तालुक्यातील अंधोरी परिसरातील खरीप पिकांचे हरिण नुकसान करीत आहेत. त्यामुळे हरिणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी शिवाजीराव भिकाने, विक्रम गुट्टे, महेश ढाकणे, प्रदीप चौकटे, शरद रुकमे, मनोज कांदनगिरे, व्यंकट हळकर, दिनेश सूर्यवंशी, लखन गिरे, नारायण शिंदे, दिनेश बेंबडे, संतोष कल्याणी, बासू कोयंडे आदींची उपस्थिती होती. या मागणीवर तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
आझाद महाविद्यालयात योग शिबिर
औसा : येथील आझाद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित सोमवारी राष्ट्रीयस्तर ऑनलाइन योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पतंजली समिती लातूरचे योगगुरु व्यंकट मुंडे यांची उपस्थिती होती. शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष तथा संस्थेचे सचिव डॉ. अफसर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. ई.यू. मासूमदार, प्रा. डॉ. एन.के. सय्यद, प्रा. डॉ. आदित्य माने, उपप्राचार्य तन्वीर जहागिरदार, प्रा. डॉ. एम.ए बरोटे यांची उपस्थिती होती. ऑनलाइन शिबिरात महाराष्ट्राबरोबरच दिल्ली, तामिळनाडू, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथून १२५ पेक्षा जास्त जणांनी सहभाग नोंदविला.
विद्यावर्धिनी विद्यालयात जागतिक योग दिन
अहमदपूर : येथील विद्यावर्धिनी विद्यालयात संस्थेचे संस्था सचिव प्रा. शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंगचे लक्ष्मण भंडारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे, यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे ,असे त्यांनी सांगितले. योग दिनानिमित्त सामान्यज्ञान प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले होते. योग दिनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सुषमा पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक धोंडीराज सावरगावे यांनी तर आभार अर्जून केंद्रे यांनी मानले.
===Photopath===
220621\img-20210622-wa0011.jpg
===Caption===
रवी पाटील यांची नियुक्ती