शिरुर अनंतपाळ तालुक्यात ३८ गावात ‘एक गाव एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST2021-09-17T04:24:28+5:302021-09-17T04:24:28+5:30

शिरुर अनंतपाळ येथील गणेश मंडळांना ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसा लाभला असून, शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी किसान गणेश मंडळाची स्थापना ...

'Ek Gaon Ek Ganpati' in 38 villages in Shirur Anantpal taluka | शिरुर अनंतपाळ तालुक्यात ३८ गावात ‘एक गाव एक गणपती’

शिरुर अनंतपाळ तालुक्यात ३८ गावात ‘एक गाव एक गणपती’

शिरुर अनंतपाळ येथील गणेश मंडळांना ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसा लाभला असून, शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी किसान गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने १७ गणेश मंडळ स्थापन झाले आहेत. तालुक्यात ४८ गावे असली तरी पोलीस ठाण्यांतर्गत ६४ गावे आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच असल्याने जास्तीत जास्त गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात यावी म्हणून येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंगद सुडके, मलय्या स्वामी यानी गणेश मंडळाच्या पदाधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांची बैठक घेऊन एक गाव एक गणपतीसाठी आवाहन केले होते. त्यामुळे ३८ गावात एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. तर उर्वरित ४३ गावात एक पेक्षा अधिक मंडळांनी श्री गणरायाची स्थापना केली आहे. शहरात सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या १७ मंडळांची स्थापना करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सुडके यांनी सांगितले. यावेळी गुप्तचर विभागाचे शाम येडले पाटील, लक्ष्मण पाटील यांचीही उपस्थिती होती.

गणेश उत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त...

गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामध्ये दोन अधिकारी, २५ पोलीस हेडकॉन्स्टेबल २९ असे ५६ अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्सवाच्या काळात सर्वत्र शांतता असल्याचे पोलीस निरीक्षक सुडके यांनी सांगितले. दरम्यान, गणेश मंडळाच्या वतीने कोरोनाच्या नियमांचे पालन करीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

Web Title: 'Ek Gaon Ek Ganpati' in 38 villages in Shirur Anantpal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.