लातूररोड-जळकोट-मुखेड-बोधन रेल्वेमार्गासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST2021-07-26T04:19:56+5:302021-07-26T04:19:56+5:30
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, जळकोटला डोंगरी तालुक्याचा दर्जा देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून काही निकषांची अडचण येत आहे. त्यामुळे ...

लातूररोड-जळकोट-मुखेड-बोधन रेल्वेमार्गासाठी प्रयत्न
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, जळकोटला डोंगरी तालुक्याचा दर्जा देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून काही निकषांची अडचण येत आहे. त्यामुळे खास बाब म्हणून मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे. डोंगरी तालुक्याचा दर्जा मिळाल्यास शासकीय नोकरीत, शिक्षणात येथील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. तसेच डोंगरी तालुक्याच्या सुविधाही मिळतील. त्यामुळे प्रयत्न करीत आहे.
रेल्वेमार्गासंदर्भात आपण पाठपुरावा करणार आहोत. सर्व्हे हा सॅटेलाईटवरून झाला आहे. यापूर्वी विधानसभेतही ठराव पारित झाला आहे. त्यादृष्टीने आपण प्रयत्न करीत आहोत, असेही राज्यमंत्री बनसोडे म्हणाले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, पंचायत समितीचे सभापती बालाजी ताकबिडे, प्रशांत देवशेट्टे, गजानन दळवे, महेताब बेग, पाशाभाई शेख, दिलीप कांबळे, गोविंद माने, संगायोचे अध्यक्ष संग्राम पाटील हसुळे आदी उपस्थित होते.