शिक्षण समिती करणार शिक्षिकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST2021-01-01T04:14:11+5:302021-01-01T04:14:11+5:30
वाहनाची धडक; एकजण जखमी लातूर : शेतातून गावाकडे जात असताना चारचाकी मालवाहतूक वाहनाने धडक दिल्याची घटना कातपूर रोड परिसरात ...

शिक्षण समिती करणार शिक्षिकांचा गौरव
वाहनाची धडक; एकजण जखमी
लातूर : शेतातून गावाकडे जात असताना चारचाकी मालवाहतूक वाहनाने धडक दिल्याची घटना कातपूर रोड परिसरात घडली. या प्रकरणी मालवाहतूक चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कातपूर शिवारात १५ वर्षांचा मुलगा शेतातून गावाकडे पायी जात असताना भरधाव वेगात आलेल्या वाहनाने धडक दिली. यामध्ये मुलगा जखमी झाला आहे. दिलेल्या तक्रारीवरून चालकाविरुद्ध लातूर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद आहे.
महिला तंत्रनिकेतनच्या ३९ मुलींची निवड
लातूर : येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतनमधील अंतिम वर्षातील ३९ विद्यार्थिनींची कॅम्पस मुलाखतीमध्ये निवड झाली आहे. यावेळी प्राचार्य डॉ. आगरकर, लातूरकर, विभाग प्रमुख ए.जी. बादाडे, एस.व्ही. चव्हाण आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात ३१३ जणांवर उपचार सुरू
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असून, सध्या ३१३ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १५८ जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७१ टक्क्यांवर पोहोचले असून, आतापर्यंत २१ हजार ९३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने प्रयोगशाळेतील चाचण्या आणि रॅपिड अँटीजन चाचण्यांवर अधिक भर दिला जात आहे.
दयानंद कलामध्ये विद्यापीठस्तर कार्यशाळा
लातूर : दयानंद कला महाविद्यालयात राज्यशास्त्र आणि राष्ट्रीय विभाग आणि युवक बिरादरीच्या संयुक्त विद्यमाने युवा संसद : सहभाग आणि कामगिरी या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड, पंकज इंगोले, अमेय पाटील, मेघराज शेवाळे, डॉ. विलास कोमटवाड, डॉ. सुनील साळुंके, डॉ. सुनीता सांगोले, प्रा. रमेश काटेकर, प्रा. महेश जंगापल्ले, भरत पवार, तय्यब सय्यद यांची उपस्थिती होती.
बिडवे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे यश
लातूर : शहरातील एम.एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ७ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. यामध्ये रेणुका बच्चेवार, नमिरा कादरी, संगीता तिवारी, शताक्षी रामपुरे, मयुरी कुलकर्णी, रोहिणी भुप्पा, विराट कांबळे आदींचा समावेश आहे. या यशाबद्दल प्राचार्य बस्वराज धरणे, प्रा. अविनाश पेद्दे आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
उपप्राचार्यपदी डॉ. राजाराम पवार यांची नियुक्ती
लातूर : दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा.डॉ. राजाराम सखाराम पवार यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, प्राचार्य डॉ. श्रीराम सोळुंके, डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. जयप्रकाश दरगड, सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. डॉ. पवार यांनी वाणिज्य महाविद्यालयात ३२ वर्षे अध्यापनाचे कार्य केले असून, स्वारातीम विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर त्यांनी काम पाहिले आहे. चार विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. प्राप्त केली आहे. याबद्दल प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.