खाद्यतेलाने महागाईत 'तेल ओतले'; ४० रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:20 IST2021-04-01T04:20:18+5:302021-04-01T04:20:18+5:30
गृहिणी म्हणाल्या... गॅसचा दर वाढला आहे. किराण्याचाही भाव वधारलेला आहे. आता तेल महाग झाले आहे. त्यामुळे भाजीला फाेडणी द्यावी ...

खाद्यतेलाने महागाईत 'तेल ओतले'; ४० रुपयांची वाढ
गृहिणी म्हणाल्या...
गॅसचा दर वाढला आहे. किराण्याचाही भाव वधारलेला आहे. आता तेल महाग झाले आहे. त्यामुळे भाजीला फाेडणी द्यावी की नाही असा आमच्यासमोर प्रश्न आहे. भाज्याही महागल्या आहेत. दरवाढीमुळे आता गरीबांना पोटभर खाणे परवडणारे नाही. शासनाने दर कमी करण्याची गरज आहे. - अर्चनाताई कांबळे, गृहिणी
दाळी महागल्या. त्यानंतर गॅस महागला आता गोडतेल महागले आहे. ९० रुपयांना एक किलो तेलाचे पॉकीट मिळत होते. आता ते १४० रुपये झाले आहे. काही दुकानदार तर १५० रुपये घेत आहे. नफा कमविण्याची हद्द असते. मात्र, त्याचा कुणी विचार करत नाही. गरीबाने खावे की नाही अशी परिस्थिती आहे. शासनाने थोडा विचार करावा. -शन्नो पठाण, गृहिणी
सुर्यफूल, शेंगादाणा, करडई आणि सोयाबीन या सर्वच तेलाचे दर वाढले आहे. करडईचा दर थोडा कमी आहे. परंतू अन्य तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक उत्पादकांकडूनही दर वाढविले आहेत. या महागाईमुळे ओढाताण होत आहे. भाजीपाल्याचे दर वाढले आहेत त्यात तेलाच्या दरामुळे किचनचे बजेट कोलमडले आहे. - राणी ढोले, गृहिणी
कोट....
तेलबिया महागल्यामुळे तेलाच्या दरात वाढ झालेली आहे. करडई वगळता सर्वच तेलाचे भाव ४० रुपयांनी वाढले आहेत. जिथे १५० रुपये भाव होता ते तेल १९० वर पोहचले आहे. पामतेलाची आयात शासनाने कमी केली आहे. त्यामुळे तेलदरात वाढ झाली आहे. तेल महागल्यामुळे शेतक-यांच्या तेलबियांना चांगला भाव मिळत आहे. ही बाब समाधानकारक आहे. - मोहन परदेशी, व्यापारी, लातूर