लातूरच्या खाद्यसंस्कृतीची चव खवय्यांना चाखायला मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:20 AM2021-01-25T04:20:11+5:302021-01-25T04:20:11+5:30

लातूर : ग्राम विकास व जलसंधारण विभाग अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादीत ...

Eaters will get a taste of Latur's food culture | लातूरच्या खाद्यसंस्कृतीची चव खवय्यांना चाखायला मिळणार

लातूरच्या खाद्यसंस्कृतीची चव खवय्यांना चाखायला मिळणार

Next

लातूर : ग्राम विकास व जलसंधारण विभाग अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन व विक्री जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर २६ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत या हिरकणी हाट च्या माध्यमातून होणार आहे. याच दरम्यान रोज सायंकाळी ७ वाजता विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी या महोत्सवास लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहून महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष जोशी यांनी केले आहे.

या हिरकणी हाट मध्ये महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या दर्जेदार अभिनव अशा वस्तुंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.या कार्यक्रमाच्या दरम्यान रोज सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जानेवारी रोजी पोवाडा, शिवगिते, २७ जानेवारी रोजी मराठी गाणी व लोकगितांचा मेहंदीच्या पानावर हा कार्यक्रम, २८ जानेवारी रोजी गीतरामायण, २९ जानेवारी रोजी अभंगवाणी/ भजनसंध्या आणि ३० जानेवारी रोजी संगीत रजनी व खेळ रंगीला पैठणीचा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मात्र २६ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत क्रीडा संकुलाच्या मैदानावर महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री रोज सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत राहणार आहे. लातूरकरांसाठी हे प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम एक मेजवाणीच ठरणार असल्याने लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमास भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Eaters will get a taste of Latur's food culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.