करपा रोगाने बटाटा, हाळद पीक धाेक्यात, उत्पादनात हाेणार घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:43+5:302021-02-05T06:24:43+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ परिसरात काही शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात बटाटा, आद्रक, हळदीचे उत्पादन घेण्यासाठी माेठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. ...

करपा रोगाने बटाटा, हाळद पीक धाेक्यात, उत्पादनात हाेणार घट
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ परिसरात काही शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात बटाटा, आद्रक, हळदीचे उत्पादन घेण्यासाठी माेठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. मात्र, हळद आणि बटाट्यावर तांबेरा पिवळसर राेगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी कमालीचा अडचणीत आला आहे. परिणामी, यंदा बटाटा, हळद आणि आद्रकाचे उत्पादन घटणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली. त्याचबराेबर परतीच्या पावसानेही जिल्ह्याला झाेडपून काढले. यामुळे तालुक्यातील नदी-नाले, पाझर तलाव, विंधन विहिरी आणि मध्यम, लघु प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली. याच पाण्यावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवनवे प्रयाेग करत उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. डिगाेळ शिवारातही यंदा बटाटा, आद्रक, हळदीची लागवड माेठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या पिकावर तांबेरा, बुरशी राेगाचा प्रादुर्भाव झाल्याने हे पीक धाेक्यात आले आहे. हे पीक कसे वाचवायचे, हीच चिंता आता शेतकऱ्यांना सतावत आहे. पाने पिवळी पडून जाग्यावरच करपून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
लातूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या अधिक आहे. यातून आर्थिक परिस्थिती सुधारेल म्हणून शेतकऱ्यांनी उसाची लागवड माेठ्या प्रमाणावर केली आहे. बदलत्या तंत्राबरोबरच गेल्या काही वर्षांपासून रोगांचा प्रादुर्भाव कायम राहिला आहे. निलंगा तालुक्यात तांबेरा बुरशी रोगाचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात झाला आहे. उसावर तांबेरा हा कवकजन्य रोग बुरशीमुळे होत असल्याचे समाेर आले आहे. उसाच्या पानावर सुरुवातीला तांबडे, काळे ठिपके पडतात. त्यानंतर ठिपक्यांचा आकार वाढत जातो आणि उसाच्या पानांचा भुगा होताे. उसाची पाने तांबडी पडल्याने पानाच्या खालील बाजूस तांबूस पिटळी पडते. परिणामी, पीकच धाेक्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान हाेत आहे. यातून उसाची वाढ खुंटत जाते अन् वजन कमी भरते. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस खराब झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार...
डिगोळ येथील साेसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील यांनी एक एकरात बटाटा, एका एकरमध्ये आद्रक आणि एक एकरावर हळदीचे पीक घेतले आहे. डोंगरभागातील शेतीमध्ये बटाटा पिकाचे प्रमाण अधिक आहे. सतत रासायनिक खतांचा वापर, युरियाचा अधिक वापर यामुळे तांबेरा रोग पडला आहे. असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. यावर आता औषधांची फवारणी करण्याची गरज आहे. याबाबत आम्ही माहिती घेत असून, शेतकऱ्यांना फवारणीसाठी मार्गदर्शन करू, शिवाय वेळाेवेळी माहती देऊ, असे कृषी सहायक संभाजी सूर्यवंशी म्हणाले.