जिल्ह्यात पाच ठिकाणी होणार ड्राय रन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:59 IST2021-01-08T04:59:29+5:302021-01-08T04:59:29+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, उपजिल्हा रुग्णालय उदगीर, प्राथमिक आरोग्य केंद्र भातागळी, ग्रामीण रुग्णालय मुरुड व शहरी आरोग्य ...

जिल्ह्यात पाच ठिकाणी होणार ड्राय रन
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, उपजिल्हा रुग्णालय उदगीर, प्राथमिक आरोग्य केंद्र भातागळी, ग्रामीण रुग्णालय मुरुड व शहरी आरोग्य केंद्र मंठाळे नगर या पाच ठिकाणी सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीत ड्राय रन आयोजित केलेला आहे, या पाच केंद्रावर नोंदणी केलेल्या आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी प्रत्येकी २५ लोकांना बोलावून घेऊन लसीकरणाच्या अनुषंगाने रंगीत तालीम केली जाणार आहे. लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदास यांच्यासह आरोग्य विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी सदर माहिती सांगण्यात आली. आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्सेस व इतर फ्रन्टलाइन आरोग्य कर्मचारी सुमारे १७ हजार ५०० जणांची नोंदणी ऑनलाइन द्वारे झालेली आहे. या ड्राय रन द्वारे कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम होईल. ऑनलाइन नोंदणीसाठी को-इन हे सॉफ्टवेअर वापरण्यात आले आहे. याद्वारे सर्व कार्यप्रणालीची माहिती घेतली जाणार आहे. प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबवताना कोणतीही अडचण येणार नाही, याबाबत दक्षता घेतली जाणार आहे.