वाहने सावकाश चालवा; माेकाट जनावरे वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST2021-09-23T04:22:37+5:302021-09-23T04:22:37+5:30
माेकाट जनावरांना वाली काेण? लातूर शहरासह जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा शहरांतील रस्त्यांवर माेकाटपणे फिरणाऱ्या, दिवसदिवस रस्ता अडवून ठेवणाऱ्या ...

वाहने सावकाश चालवा; माेकाट जनावरे वाढली!
माेकाट जनावरांना वाली काेण?
लातूर शहरासह जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा शहरांतील रस्त्यांवर माेकाटपणे फिरणाऱ्या, दिवसदिवस रस्ता अडवून ठेवणाऱ्या जनावरांना वाली काेण? असा सवाल त्रस्त नागरिक, वाहनधारकांतून उपस्थित केला जात आहे. रस्त्यावर, चाैका-चाैकांत ठाण मांडून बसणाऱ्या जनावरांमुळे वाहतुकीचा खाेळंबा हाेत आहे. याकडे संबंधिताचे दुर्लक्ष हाेत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त हाेत आहे.
कारवाई गतिमान करण्याची गरज
लातूर शहर महापालिकेच्या वतीने माेकाट जनावरांच्या मालकांवर करण्यात येणारी कारवाई आता गतिमान करण्याची गरज आहे. दिवसेंदिवस शहरातील वाढणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहतुकीचा हाेणारा खाेळंबा याचा विचार करून माेकाट जनावरांना काेंडवाड्यात काेंडण्याची गरज आहे. मात्र, याबाबत महापालिका प्रशासन उदासीन दिसून येत आहे. सध्याला दिवस-दिवस चाैका-चाैकांत माेकाट जनावरांचा ठिय्या दिसून येत आहे.
माेकाट जनावरांचा बंदाेबस्त करावा...
लातूर शहरासह जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी रस्त्यावर माेकाट जनावरांचा वावर अलीकडे माेठ्या प्रमाणावर वाढला आहे. यातून भरधाव वाहनाचा अपघात हाेण्याची भीती व्यक्त हाेत आहे. आता माेकाट जनावरांचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी त्रस्त वाहनधारक, नागरिकांतून हाेत आहे. माेकाट जनावरांच्या मालकांचा शाेध घेण्याची गरज आहे.
- प्रकाश जाधव, लातूर
या मार्गावर वाहने जपून चालवा...
गांधी चाैक ते गंजगालाई
गूळ मार्केट चाैक ते गांधी चाैक
शाहू चाैक ते विवेकानंद चाैक
गांधी चाैक ते पाचनंबर चाैक
औसा राेड, अंबाजाेगाई राेड