डॉ. हणमंत वडगावे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:24 IST2021-09-04T04:24:30+5:302021-09-04T04:24:30+5:30

सध्या राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेतील अधिका-यांच्या बदल्यांचे सत्र सुरु आहे. कोविड काळात उत्कृष्ट कार्य केलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ...

Dr. Hanmant Wadgaon New District Health Officer | डॉ. हणमंत वडगावे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी

डॉ. हणमंत वडगावे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी

सध्या राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेतील अधिका-यांच्या बदल्यांचे सत्र सुरु आहे. कोविड काळात उत्कृष्ट कार्य केलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांची आरोग्य उपसंचालक कार्यालयात बदली झाली आहे. त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांची बदली झाली आहे. डॉ. वडगावे हे मुळचे लातूर जिल्ह्यातील लोहारा येथील आहेत. त्यांनी यापूर्वी सोलापूर, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, बीड येथे कार्य केले आहे.

जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह सोळुंके यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डी.बी. गिरी यांची बदली झाली आहे. गिरी हे लातूर जिल्ह्यातील वाडी- वाघोली येथील आहेत. त्यांनी यापूर्वी उदगीर, अंबाजोगाई, तसेच तत्कालिन ग्रामविकास मंत्र्याच्या कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्य केले आहे.

आरोग्य यंत्रणा सक्षमीकरण...

शासनाच्या विविध योजना आहेत. त्या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच खेड्या- पाड्यातील रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. कोविडमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम झाली आहे. ती आणखीन बळकट करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे, असे नूतन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी सांगितले.

Web Title: Dr. Hanmant Wadgaon New District Health Officer