डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:10+5:302020-12-07T04:14:10+5:30
उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. येथील ग्रामपंचायतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संगम अष्टुरे, ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. येथील ग्रामपंचायतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संगम अष्टुरे, अन्वर हवालदार, महेबूब शेख, गजानन तळभोगे, शिवाजी हावरगे, तानाजी हाळणे, विश्वनाथ काळे, अंकुश जाधव आदी उपस्थित होते.
उदगीर तालुक्यातील एकुर्का रोड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. राजेश भारती, राजकुमार कांबळे, दिलीप गुंडरे, दिनकर जाधव, सूरज कांबळे, मनोहर कंजे, माधव कांबळे, सतीश सदाफुले, बालाजी कंजे, रावसाहेब वाघमारे, विनायक पाटील, बालाजी कांबळे, श्याम कांबळे, उद्धव कांबळे, व्यंकट कांबळे, पंकज कांबळे, गौतम कांबळे, माधव सदाफुले, सचिन कांबळे, ज्ञानोबा कांबळे, विकी कंजे, पप्पू गुंडरे, आकाश कांबळे, विजय कांबळे, मारुती कांबळे, विशाल कांबळे, नवनाथ कांबळे, रंगनाथ पेरके आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डी.टी. कांबळे यांनी केले, तर आभार प्रा. रवी कांबळे यांनी मानले.
अहमदपूर येथे अभिवादन कार्यक्रम...
अहमदपूर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आ. बाबासाहेब पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे मुख्य प्रशासक शिवानंद हेंगणे, शहराध्यक्ष अजहर बागवान, रिपाइंचे राज्य सचिव बाबासाहेब कांबळे, अरुण वाघंबर, संजय कांबळे, चंद्रशेखर भालेराव, जीवन गायकवाड, धर्मपाल गायकवाड, प्रा. बालाजी आचार्य, ज्ञानोबा भोसले, अशोक सोनकांबळे, आशिष तोगरे, जावेद बागवान, किरण बारमाळे, प्रा. रत्नाकर नळेगावकर, महेश देवणे, लखन गायकवाड, फेरोज शेख, संदीप शिंगाडे यांची उपस्थिती होती.
अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. बब्रुवान मारे होते. यावेळी डॉ. सतीश ससाणे, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांच्यासह प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच मारुती नेटके, खंडू नेटके, प्रशांत नेटके, जैनू काळे, हणमंत नेटके, प्रवीण नेटके, परमेश्वर शिंदे, प्रमोद नेटके, अमित भिसे, श्रीराम नेटके आदी उपस्थित होते.