डॉ. जाकीर हुसेन कन्याशाळेचे उज्ज्वल यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST2021-07-19T04:14:49+5:302021-07-19T04:14:49+5:30
लातूर : शहरातील गौसपुरा कोल्हे नगर भागातील डॉ. जाकीर हुसेन कन्याशाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. उर्दु माध्यमातून ...

डॉ. जाकीर हुसेन कन्याशाळेचे उज्ज्वल यश
लातूर : शहरातील गौसपुरा कोल्हे नगर भागातील डॉ. जाकीर हुसेन कन्याशाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. उर्दु माध्यमातून फरहीन खय्युम शेख ९७.८० टक्के प्रथम, अर्शिया इब्राहिम चौधरी ९२.८० टक्के द्वितीय, सालेहा अहेमद चाैधरी ८९.२० टक्के गुण घेऊन तृतीय, महेक दस्तगीर शेख ८८.४० टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे. मराठी माध्यमातून साक्षी दत्ता कांबळे ९३.६० टक्के प्रथम, संध्या छगन जाधव ८९.४० द्वितीय, आरती नरसिंग शिंदे ८९.२० तृतीय आली तर निलोफर मैनोद्दीन शेख हिने ८८.८० टक्के गुण घेतले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव के.एम.कादरी, संस्थाध्यक्ष असीर कादरी, उपाध्यक्ष फसियोद्दीन सिद्दीकी, संचालक अजमत खान, मुख्याध्यापिका नुसरत कादरी, मुख्याध्यापक रियाज अहेमद सिद्दीकी, सत्तार शेख, निजामोद्दीन सिद्दीकी, जिलानी शेख, अब्बास शेख, सुभाष लंगर, सिराज पटेल, हलीमा बागवान, राम जोशी, रेहाना सय्यद, सबीहा बागमारू, नसिरोद्दीन खतीब, शाहीन शेख, विलास केदार, अब्दुल वाजीद यांनी कौतुक केले.