सुवर्णबिंदू प्राशन शिबिरात बालकांना डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:00+5:302021-07-12T04:14:00+5:30
उदगीर / डोंगरशेळकी : तालुक्यातील डोंगरशेळकी येथे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व शतायू आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने ...

सुवर्णबिंदू प्राशन शिबिरात बालकांना डोस
उदगीर / डोंगरशेळकी : तालुक्यातील डोंगरशेळकी येथे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व शतायू आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने पुष्य नक्षत्रानिमित्त ० ते १६ वर्षे वयोगटातील बालकांची रोगप्रतिकारशक्ती, बुद्धी वाढीसाठी मोफत सुवर्णबिंदू प्राशन शिबिर रविवारी घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सरपंच नागरबाई व्यंकटराव कांबळे होत्या. यावेळी प्रा. श्याम डावळे, उपसरपंच गणपत पवार, डॉक्टर सेलच्या अध्यक्ष डॉ. भाग्यश्री घाळे, आरोग्य समुपदेशक शिफा खुरेशी, नरसन मरेवाड, समाधान कांबळे, राहुल गजभारे, राजू पुंड, राहुल पुंड, सुशांत आपटे, आकाश मरलापल्ले, विष्णू बरुरे, आदी उपस्थित होते. शिबिरात ३५७ बालकांना डोस देण्यात आले. या शिबिरासाठी अंगणवाडी सेविका दैवशाला बिरादार, अनुसया राठोड, सुशीला केंद्रे, आशा कार्यकर्ती मीरा सुवर्णकार, म्हादाबाई कांबळे यांनी पुढाकार घेतला.