शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
2
'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
3
जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
4
सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
5
"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
6
ट्रम्प टॅरिफबाबत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काय-काय झालं? भारतावर किती परिणाम, जाणून घ्या
7
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! सांबाच्या फ्लोरा गावात ड्रोनने पाडलं पॅकेट; बीएसएफने उधळला पाकचा डाव
8
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
9
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
10
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
11
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
12
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
13
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
14
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
15
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
16
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
17
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
18
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
19
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
20
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय कुरघोडी नकोत, प्रभागात विकास कामे काय करणार? मतदारांचा उमेदवारांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 20:02 IST

महापालिकेच्या १८ प्रभागातील ७० जागांसाठी ३५९ उमेदवार रिंगणात आहेत. मागील चार दिवसांपासून प्रचाराचा धुराळा उडत आहे.

- आशपाक पठाणलातूर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, गल्लोगल्ली प्रचाराचा धडाका पाहायला मिळत आहे. खांद्यावर पक्षाचा रुमाल, हात जोडून मते मागणारे कार्यकर्ते आणि पोस्टर, बॅनरची गर्दी वाढली आहे. मात्र, प्रचारात विकासकामांपेक्षा तिकीट कसे मिळाले, कोण बाजूला झाले, शेवटी कोणाला संधी मिळाली, याच चर्चा अधिक रंगताना दिसत आहेत. यावर जागरूक मतदार राजकीय कुरघोडी नकोत, विकासाचं उत्तर द्या, आमच्या वॉर्डात काय करणार ते सांगा? असा सवाल करीत आहेत.

महापालिकेच्या १८ प्रभागातील ७० जागांसाठी ३५९ उमेदवार रिंगणात आहेत. मागील चार दिवसांपासून प्रचाराचा धुराळा उडत आहे. महापालिकेचा विस्तार वाढला असला तरी शहरालगतच्या नव्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा अद्याप अपुऱ्या आहेत. कर मात्र नियमित वसूल केला जातो. नळाचे पाणी, रस्ते व गटारी, घंटागाडी, सुरळीत वीजपुरवठा, पथदिवे, अंगणवाडी व रेशन दुकानांची सुविध आदी नागरिकांच्या प्रमुख मागण्या आहेत. नव्या उमेदवारांकडून या समस्या मार्गी लागाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, अनेक उमदेवारांचे कार्यकर्ते अजूनही आपल्याला तिकीट कसे मिळाले, कोणाचे कटले जमेची बाजू यावर चर्चा करीत आहेत. वॉर्डात आलेली प्रचार रॅली पक्षाचे गुणगान गाऊन जात आहे. उमेदवार मतदारांचा आशीर्वाद घेत पुढे जात आहेत. कोणी पथदिव्यांची समस्या, कोणी गटारी, कचरा, रस्त्याची समस्या मांडत असून, त्यावर उमेदवारांचे उत्तर संधी द्या, करून दाखवितो, असेच मिळत आहे. प्रमुख पक्षाचे उमेदवार असोत की अपक्ष प्रत्येकजण आश्वासन देऊन वेळ मारून नेत असल्याची भावना जागरूक मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.

पथदिवे बंद पडलेत, ते कधी लागतील...प्रभागातील पथदिवे बंद पडलेत, रिकाम्या प्लॉटवर कचऱ्याचे ढीग लागतात. दुर्गंधी वाढतेय, रात्रीच्या वेळी रस्त्याने जाताना महिला, मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे, यावर काय करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. वाढीव वसाहतींमध्ये रस्ते, नाल्यांची समस्या मोठी आहे. इथे मात्र उमेदवारांची मतदारांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दमछाक होत आहे.

पावसाळ्यात मुलांना शाळेतही जात आलं नाही...प्रभाग क्रमांक १ व २ मधील काही वाढीव वसाहतीत पावसाळ्यात नागरिकांची धांदल उडाली. चिखलमय रस्त्याने पादचारी सोडा वाहनही पुढे जाणे कठीण झाले होते. तेव्हा चार ब्रास मुरूम टाका म्हणून ओरड केली, पण कुणीही आलं नाही. आता रस्ते पक्के करा, अशी मागणी केली जात आहे.

प्रशासक असल्याने होती अडचण...मागील तीन वर्षांत मनपात प्रशासक असल्याने इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक, प्रमुख पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांनी कितीही ओरड केली तरी प्रशासक सांगतील तेच काम झाले. नागरिकांच्या मागणीवर कामे झाली नाहीत, अशा प्रश्नांना उमेदवार प्रशासक राजवटीत समस्या वाढल्याचे सांगत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Voters Demand Development Plans, Not Political Games, from Candidates

Web Summary : Latur voters demand concrete development plans from candidates instead of political maneuvering. They seek solutions for water, roads, sanitation, and electricity issues in their wards, expressing frustration with empty promises and focus on internal party politics.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६