शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
2
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
3
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
4
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
5
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
6
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
7
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
8
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
9
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
10
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
11
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
12
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
13
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
14
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
15
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
16
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
17
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
18
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
19
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

घाबरू नका, सतर्क रहा! लातूरला अतिवृष्टीसोबतच सप्टेंबर महिन्यातला तिसरा भूकंपाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 20:05 IST

लातूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; बोरवटी येथे २.२ रिश्टर स्केलची नोंद

लातूर : ३० सप्टेंबर १९९३च्या विनाशकारी भूकंपाची आठवण ताजी असताना, सप्टेंबर महिन्यात लातूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवण्याची मालिका सुरूच आहे. २६ सप्टेंबर २०२५ रोजी, सकाळी साधारण ६.३० वाजण्याच्या सुमारास लातूर तालुक्यातील बोरवटी येथे भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याची माहिती मिळाली आहे.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बोरवटी येथील या भूकंपाची नोंद २.२ रिश्टर स्केल इतकी झाली आहे. हा धक्का अत्यंत सौम्य स्वरूपाचा असला तरी, जिल्ह्यामध्ये वारंवार होणाऱ्या या नोंदींमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वारंवार होणारे भूकंपाचे धक्के

२३ सप्टेंबर रोजी लातूर तालुक्यातील मुरुड अकोला येथे रात्री सव्वाआठ वाजता २.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का नोंदवला गेला होता. २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता निलंगा तालुक्यातील हासोरी, बडूर, उस्तुरी परिसरातही सौम्य धक्के जाणवले होते. यापैकी हासोरी येथे २४ सप्टेंबर २०२५ रोजी २.४ स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात ६ सप्टेंबर २०२२ पासून आतापर्यंत १४ वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.

सप्टेंबर महिन्यातच भूकंपाचे धक्केवारंवार जाणवत असल्यामुळे ३० सप्टेंबर १९९३ मध्ये किल्लारी परिसरात आलेल्या प्रलयंकारी भूकंपाची आठवण पुन्हा एकदा जागी झाली आहे. अतिवृष्टीच्या संकटासोबतच भूकंपाचे संकट तर नाही ना, अशी शंका भयभीत झालेल्या स्थानिक नागरिकांच्या मनात येत आहे. यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातला हा तिसरा धक्का आहे.

प्रशासनाचे आवाहन; घाबरू नका, सतर्कता बाळगाभूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या दीड महिन्यापासून लातूर शहरांमध्ये आणि जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती आहे. दररोज कुठे ना कुठे अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीचे संकट असताना पुन्हा भूकंपाचे संकट येणार तर नाही ना? अशी शंका मनात येत असल्याने नागरिक भयभीत आहेत. मात्र प्रशासनाने घाबरण्याचे कारण नाही, सतर्क रहा, असे आवाहन केले आहे.

सुरक्षित राहण्यासाठी अशी घ्या खबरदारीभूकंप होत असताना किंवा झाल्यानंतर लागलीच अशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही कच्च्या घरात किंवा जुन्या इमारतीत राहत असाल, तर तत्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेत जा. जवळच्या सुरक्षित पक्क्या घरात किंवा भूकंपरोधक इमारतीत तात्पुरता आसरा घ्या. टेबल, पलंग किंवा मजबूत फर्निचरच्या खाली आश्रय घ्या. खिडक्या, काचेच्या वस्तू किंवा भिंतीपासून दूर रहा. विजेचे मुख्य स्विच बंद करा.

भूकंपानंतर काय करावेजखमींना मदत करा : जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करा आणि त्यांना सुरक्षितस्थळी हलवा.तपासणी करा : गॅस, पाणी आणि वीज यांच्या लाइनची तपासणी करा आणि काही नुकसान झाले असल्यास संबंधित विभागाला कळवा.अफवा टाळा : सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका.आपत्कालीन परिस्थितीसाठी स्थानिक प्रशासनाशी किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संपर्क साधावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Shaken by Earthquakes Amidst Heavy Rains; Stay Alert!

Web Summary : Latur experiences tremors in September, recalling the 1993 earthquake. Recent mild tremors, including one in Borwati, create anxiety amidst heavy rainfall. Authorities urge residents to stay calm, avoid rumors, and take safety precautions. Check utilities and assist the injured.
टॅग्स :laturलातूरEarthquakeभूकंप