शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'तक्रार आली तर गुन्हा दाखल करू नका'; मध्यरात्री ठाण्यात तिघांचा राडा, पोलिसांना धमकावले

By राजकुमार जोंधळे | Updated: August 9, 2023 13:44 IST

लातुरातील विवेकानंद चाैक ठाण्यातील घटना, तिघांविराेधात गुन्हा दाखल!

लातूर : पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पाेलिस कर्मचाऱ्यांसोबत आमच्या विराेधात गुन्हा दाखल करून घेऊ नका, असे म्हणून हुज्जत घालत धमकी दिल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. याबाबत बुधवारी पहाटेच्या सुमारास तिघांविरोधात लातुरातील विवेकानंद चाैक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील विवेकानंद चाैक पोलिस ठाण्यात चंद्रकला वसंत कारभारी (रा. पुणे, ह .मु. हरिभाऊनगर, लातूर), अमोल माधव सूर्यवंशी (रा. पुणे, ह. मु. उदगीर), श्रीकांत दत्तात्रय सूर्यवंशी (रा. हरिभाऊनगर, लातूर) यांनी आमच्या विराेधात आलेली तक्रार घेऊ नका, गुन्हा दाखल करू नका, असे म्हणून अश्लील भाषा वापरली. शिवाय, शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करत धमकी दिली. यावेळी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसा कर्मचाऱ्यांशी त्यांनी हुज्जत घातल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. 

याबाबत विवेकानंद चाैक पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी जरिना महेताब साब सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरोधात बुधवारी पहाटेच्या सुमारास गुरनं. ४४७ / २०२३ कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६, २९४, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक एच. जे. सय्यद करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरPoliceपोलिस