कासारसिरसीत लोकसेवा विकास पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:22 IST2021-01-19T04:22:22+5:302021-01-19T04:22:22+5:30

निलंगा तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कासारसिरसी ग्रामपंचायतीवर लोकसेवा विकास पॅनलने वर्चस्व निर्माण केले आहे. ...

Dominance of Public Service Development Panel in Kasarasir | कासारसिरसीत लोकसेवा विकास पॅनलचे वर्चस्व

कासारसिरसीत लोकसेवा विकास पॅनलचे वर्चस्व

निलंगा तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कासारसिरसी ग्रामपंचायतीवर लोकसेवा विकास पॅनलने वर्चस्व निर्माण केले आहे. एकूण १७ पैकी १२ जागांवर त्यांनी विजय मिळविला आहे. वॉर्ड क्र.६ मध्ये गोरखनाथ होळकुंदे हे केवळ एका मताने विजयी झाले आहेत.

लोकसेवा ग्रामविकास पॅनेलचे बडेसाहेब लकडहारे, वीरेश चिंचनसुरे, विवेक कोकणे, पृथ्वीराज सरवदे, प्रभावती बोळशेट्टे, ज्योती चिंचनसुरे, ममता डोंबाळे, सविता गायकवाड, दीपाली पांचाळ हे विजयी झाले आहेत. तर तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. जनसेवा विकास पॅनलचे गोरखनाथ होळकुंदे, सतीश गुत्ता, अनिस बेडगे, साळुबाई कदम व अपक्ष ललिता धायगुडे विजयी झाले. येथील मतदांरानी लोकसेवा ग्रामविकास पॅनलला कौल देत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. विजयी पॅनलच्या उमेदवारांनी गावात मिरवणूक काढत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Web Title: Dominance of Public Service Development Panel in Kasarasir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.