डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पाहताहेत लसीची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:59 IST2021-01-08T04:59:25+5:302021-01-08T04:59:25+5:30
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत २ हजार ३९५ कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातील डाॅक्टर्स व कर्मचाऱ्यांचा ...

डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पाहताहेत लसीची वाट
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत २ हजार ३९५ कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातील डाॅक्टर्स व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत ७ हजार ९८४ कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील डाॅक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील ६ हजार ५२७ जणांची नोंद झाली असून, शहरातील नागरी दवाखान्यातील डाॅक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.
या सर्वांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार असल्याचे आरोग्य प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
खाजगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नोंदणी लस घेण्यासाठी झाली आहे. ५४५ जणांची नोंदणी पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे. या सगळ्यांनाच लस येण्याची उत्सुकता आहे. भीतीचे काहीच कारण नाही. सगळ्यांनाच आता लस हवी आहे. त्याअनुषंगाने ८ जानेवारी रोजी ड्रायरन घेण्यात येणार आहे.
- डाॅ. विश्वास कुलकर्णी,
इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष
टास्क फोर्सची बैठक, लसीकरणाचे नियोजन, साठवण क्षमता, लसीकरण केंद्र आणि पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद झालेली आहे. जय्यत तयारी प्रशासनाची आहे. भीती वगैरे हा विषयच नाही. सर्व कर्मचाऱ्यांना लस घेण्याची प्रतीक्षा आहे. त्यानुसार रंगीत तालीमही ८ जानेवारीला होणार आहे.
- डाॅ. एल. एस. देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक