पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST2021-09-08T04:25:25+5:302021-09-08T04:25:25+5:30

जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या स्त्रोता जवळ अस्वच्छता पाहणी दरम्यान दिसून आली आहे. त्यामुळे ...

Do not drink water; Then be careful! | पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!

जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या स्त्रोता जवळ अस्वच्छता पाहणी दरम्यान दिसून आली आहे. त्यामुळे पाणी स्त्रोतांची शुद्धीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. ज्या ग्रामपंचायतींना रेडकार्ड देण्यात आले आहेत. त्यांनी पाण्याच्या स्त्रोताचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. त्यांना त्या संदर्भात नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार....

दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, मलेरिया, डायरिया, टायफाईड, कॉलरा, कावीळ आदी आजार उद्भवतात. उलटी,जुलाब या समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शुद्ध पाणी पिणे गरजेचे आहे. दरवर्षी पावसाळ्यात प्रस्तुत आजार उद्भवत असतात. हे आजार उद्भवू नये म्हणून खबरदारी घेणे हा त्यावर पर्याय आहे.

आजारांची लक्षणे.....

पोट दुखणे, ताप येणे, उलटी,जुलाब लागणे,अशक्तपणा येणे, डोळे व अंग पिवळे पडणे, जेवणाला चव न लागणे आदी लक्षणे या आजारांची आहेत. सर्दी,ताप, खोकला अशीही लक्षणे या आजारांची असू शकतात.

पाणी उकळून पिलेले बरे.....

सध्या पावसाळा सुरू आहे.त्यामुळे नळाचे पाणी पीत असताना उकळून पिलेले बरे. जेणेकरून पाण्याचे शुद्धीकरण होईल आणि आजारी उद्भवणार नाहीत.

लातूर शहराला दररोज लागते २५ एमएलडी पाणी...

लातूर शहराची लोकसंख्या पाच लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे दरडोई व्यक्तीच्या पाण्याचा विचार केला तर लातूर शहरासाठी दररोज २५ एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यानुसार महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मांजरा प्रकल्पातून दररोज पंचेचाळीस ते पन्नास एमएलडी पाणी उचलण्यात येते. आठदिवसा आड पाणीपुरवठा केला जात असला तरी त्याचा साठा करून दिवसाला २५ एमएलडी पिण्यासाठी पाणी लागते.

Web Title: Do not drink water; Then be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.