दो बुंद जिंदगी की....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST2021-02-05T06:25:45+5:302021-02-05T06:25:45+5:30
लाभार्थ्यांच्या संख्येनुसार तसेच वेस्टेजचे प्रमाण लक्षात घेऊन पोलिओचे डोस प्राप्त झाले आहेत. बूथनिहाय उद्दिष्ट देण्यात आले असून, १०० टक्के ...

दो बुंद जिंदगी की....
लाभार्थ्यांच्या संख्येनुसार तसेच वेस्टेजचे प्रमाण लक्षात घेऊन पोलिओचे डोस प्राप्त झाले आहेत. बूथनिहाय उद्दिष्ट देण्यात आले असून, १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. शून्य ते पाच वयोगटातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. फिरते पथक, मोबाइल पथकाद्वारे ही लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. अनेक कुटुंबं ऊसतोडीवर आहेत. त्यामुळे ऊसतोडीच्या ठिकाणीही मोबाइल पथके जातील. त्या ठिकाणी जाऊन पोलिओची मात्रा संबंधित बालकांना दिली जाईल. पालकांनी आपल्या मुलांना या पूर्वी लस दिली असेल तरी ३१ जानेवारी रोजी नजीकच्या केंद्रावर जाऊन लस द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.
० ते ५ गटातील लाभार्थी
२,५७,२२०
पोलिओ डोस प्राप्त
३,०५,०००
एकूण बूथ
१७०५
आरोग्यसेवक
५६२१
पर्यवेक्षक
४११
आरोग्य संस्था
३१२
मोबाइल पथक
१११
ट्राॅन्झर पथक
१४३
लसीकरणाची वेळ
सकाळी ८ ते सायंकाळी ५