विभागीय आयुक्तांची दिव्यांग थेरपी सेंटरला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:21+5:302021-06-03T04:15:21+5:30
या सेंटरमध्ये दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अनेक प्रकारची थेरपी देऊन दिव्यांग प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. या सेंटरमध्ये देण्यात येणाऱ्या विविध ...

विभागीय आयुक्तांची दिव्यांग थेरपी सेंटरला भेट
या सेंटरमध्ये दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अनेक प्रकारची थेरपी देऊन दिव्यांग प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. या सेंटरमध्ये देण्यात येणाऱ्या विविध थेरपी प्रात्यक्षिकांची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाहणी करून संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांशी व डॉक्टरांशी थेरपीबाबत चर्चा केली. हा उपक्रम अत्यंत चांगला असून असे उपक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. लातूर जिल्ह्याने हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल विभागीय आयुक्त यांनी सर्वांचे कौतुक केले. तसेच हा राज्यातील पथदर्शक उपक्रम असल्याचे नमूद करून केंद्र सुरळीत चालविण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले. या उपक्रमाची व प्रगतिपथावर असलेल्या सेंन्सरी गार्डनची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, आदींची उपस्थिती होती.