रेणापूर पंचायत समिती सभापतीविरुध्द अविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST2021-09-09T04:25:11+5:302021-09-09T04:25:11+5:30

रेणापूर पंचायत समितीत ८ गण असून, गत निवडणुकीत भाजपाचे आठही सदस्य निवडून आले होते. पहिल्या अडीच वर्षांच्या काळात सभापती ...

Distrust against Renapur Panchayat Samiti Chairman | रेणापूर पंचायत समिती सभापतीविरुध्द अविश्वास

रेणापूर पंचायत समिती सभापतीविरुध्द अविश्वास

रेणापूर पंचायत समितीत ८ गण असून, गत निवडणुकीत भाजपाचे आठही सदस्य निवडून आले होते. पहिल्या अडीच वर्षांच्या काळात सभापती म्हणून अनिल भिसे, उपसभापती म्हणून अनंत चव्हाण यांची निवड झाली. दुसऱ्या अडीच वर्षांच्या काळासाठी सभापतीपद हे सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले. त्यानुसार भाजपाकडे या प्रवर्गाचे रमेश सोनवणे, बायनाबाई साळवे हे दोघे होते. तेव्हा रमेश सोनवणे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली.

पंचायत समिती निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना पंचायत समितीचे विद्यमान सभापती रमेश सोनवणे यांच्या विरोधात भाजपाच्या ६ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. सोनवणे हे सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करतात. कामांत जाणीवपूर्वक अडथळे आणतात, असे म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर निर्णय घेण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता विशेष सभा आयोजित केली आहे. अविश्वास ठरावावर माजी सभापती अनिल भिसे, विद्यमान उपसभापती अनंत चव्हाण, सदस्य बहिणाबाई साळवे, चंद्रकला इंगोले, चंचला घुले, संध्या पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Distrust against Renapur Panchayat Samiti Chairman