जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत ४५ मल्लांनी ठोकला शड्डू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:19 IST2021-02-13T04:19:16+5:302021-02-13T04:19:16+5:30
गादी व माती गटांत स्पर्धा महाराष्ट्र केसरीसाठी लातूर जिल्ह्यातील मल्लांनी गादी व माती गटांसाठी कौशल्याचे सादरीकरण करत स्पर्धेत चुणूक ...

जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत ४५ मल्लांनी ठोकला शड्डू
गादी व माती गटांत स्पर्धा
महाराष्ट्र केसरीसाठी लातूर जिल्ह्यातील मल्लांनी गादी व माती गटांसाठी कौशल्याचे सादरीकरण करत स्पर्धेत चुणूक दाखविली. केवळ खुल्या गटातच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असल्याने जिल्हास्तरावर खुल्या गटाची निवड चाचणी झाली. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या विविध वयोगटांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्या- त्या वयोगटाच्या स्पर्धा जिल्हास्तरावर घेण्यात येणार आहेत.
कोरोनानंतर स्पर्धेने मल्ल आनंदीत
कोरोनाकाळात मल्लांनी घरच्या घरीच शारीरिक कसरती करत आपली लय कायम राखली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास नऊ महिने स्पर्धा बंद होत्या. त्यामुळे खेळाडू हिरमुसले होते. मात्र, महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यात मल्लांनी पुन्हा मातीवर उतरत आपले कौशल्य सिद्ध केले. यामुळे मल्लांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसून येत होता.
कॅप्शन :
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी... महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी लातूर जिल्ह्याच्या संघ निवडीसाठी बोरगाव काळे येथे जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील मल्लांनी कसब पणाला लावले.