जिल्हास्तरीय रंगारंग स्पर्धेचे बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST2020-12-06T04:20:36+5:302020-12-06T04:20:36+5:30

रेणापूर : जागतिक अपंग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रंगारंग स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवारी येथील गटसाधन केंद्रात झाले. या स्पर्धेत ...

District level colorful competition prize distribution | जिल्हास्तरीय रंगारंग स्पर्धेचे बक्षीस वितरण

जिल्हास्तरीय रंगारंग स्पर्धेचे बक्षीस वितरण

रेणापूर : जागतिक अपंग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रंगारंग स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवारी येथील गटसाधन केंद्रात झाले. या स्पर्धेत हरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील जान्हवी माने हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

बक्षीस वितरणास गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी, गटसमन्वयक गोविंद पुरी, विस्तार अधिकारी सय्यद, केंद्रप्रमुख भिकाणे, बोळे यांची उपस्थिती होती. दिव्यांग मुलांसाठीच्या या ऑनलाईन स्पर्धेत तालुक्यातून ७५ मुलांनी सहभाग नोंदविला होता. इयत्ता पहिली ते चौथीच्या वयोगटात हरवाडी जिल्हा परिषद शाळेतील जान्हवी माने हिने प्रथम क्रमांक पटकाविला. याच गटात दर्जी बोरगाव येथील केंद्रीय शाळेतील सागर लोणकर याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.

इयत्ता ५ वी ते ८ वीच्या गटात खरोळा येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयातील प्रणाली राऊतराव हिने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच वांगदरी प्राथमिक शाळेतील अंजली कराड हिने प्रथम क्रमांक मिळविला. इयत्ता ९ ते १२ वी गटात दयाराम पनगुले याने जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविला. तालुक्यात शरद राठोड याने प्रथम क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यंकोबा खंदाडे, छाया सदाफुले, प्रदीप बरुरे, भागवत जाधवर, मंजूषा आचमे आदी उपस्थित होते.

यशस्वितेसाठी रुक्मिणी थोरे, केशव गायकवाड, संदीप कराड, धर्मराज भोई यांनी परिश्रम घेतले. आभार अंजली सोळंके यांनी मानले.

Web Title: District level colorful competition prize distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.