नव्या वर्षात साकारणार जिल्हा रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST2021-01-01T04:14:16+5:302021-01-01T04:14:16+5:30
राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत सदर जिल्हा रुग्णालय बांधून देण्यात यावे, असा ठराव नुकताच लातूर जिल्हा परिषदेने घेतला असून, तो ...

नव्या वर्षात साकारणार जिल्हा रुग्णालय
राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत सदर जिल्हा रुग्णालय बांधून देण्यात यावे, असा ठराव नुकताच लातूर जिल्हा परिषदेने घेतला असून, तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शिफारशीसह पाठविण्यात आला असून, राज्य शासनाकडून हा ठराव केंद्र शासनाकडे पाठविला जाणार आहे. जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर राज्य शासन ४० आणि केंद्र शासनाचा ६० टक्के निधी मिळेल. त्यातून जिल्हा रुग्णालयाची भव्य वास्तू साकारेल. नूतन वर्षात हा उपक्रम मार्गी लागेल, अशी अपेक्षा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी व्यक्त केली. ट्रामा केअरच्या अत्याधुनिकीकरणाचे प्रस्तावही मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.
शासनाच्या जिल्ह्यातील आरोग्य संस्था
ग्रामीण रुग्णालय १०
उपजिल्हा रुग्णालय २
स्त्री रुग्णालय १
प्राथमिक आरोग्य केंद्र ४६
उपकेंद्र २
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय १