पानगाव चैत्य स्मारकाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:26 IST2021-02-26T04:26:37+5:302021-02-26T04:26:37+5:30
पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक उभारणीसाठी चैत्य स्मारक ट्रस्टने ३ एकर १३ गुंठे जमीन खरेदी केली. या ...

पानगाव चैत्य स्मारकाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक उभारणीसाठी चैत्य स्मारक ट्रस्टने ३ एकर १३ गुंठे जमीन खरेदी केली. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य चैत्य स्मारक उभे रहावे, अशी आंबेडकरी अनुयायींची इच्छा होती. तत्कालिन पर्यटन मंञी व सध्याचे पालकमंञी अमित देशमुख यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ७२ लाखांची चैत्य स्मारकाची इमारत पुर्ण झाली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष व्ही.के. आचार्य यांनी जिल्हाधिकारी व सीईओंना दिली. तेव्हा येथे कोणत्या गैरसोयी आहेत, याची माहिती जिल्हाधिकारी व सीईओंनी घेतली. या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिका-यांनी केल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार राहुल पाटील, गटविकास अधिकारी मोहन अभंगे, मंडळ अधिकारी देवकते, बांधकाम विभागाचे मिटकरी, तलाठी कमलाकर तिडके, स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व्ही.के. आचार्य, सरपंच सुकेश भंडारे, ग्रामविकास अधिकारी गोपिनाथ टकले, अंगणवाडी पर्यवेक्षिका उज्ज्वला देशपांडे, गुलाब चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य शीला आचार्य, गौतम आचार्य आदी उपस्थित होते.