रेणापुरात दोन हजार फळरोपांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST2021-06-29T04:14:53+5:302021-06-29T04:14:53+5:30

रेणापूर येथील उद्धव सरवदे हे परळी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना वृक्षलागवड व संवर्धनाची आवड आहे. गेल्या वर्षी त्यांनी ...

Distribution of two thousand fruit saplings in Renapur | रेणापुरात दोन हजार फळरोपांचे वाटप

रेणापुरात दोन हजार फळरोपांचे वाटप

रेणापूर येथील उद्धव सरवदे हे परळी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना वृक्षलागवड व संवर्धनाची आवड आहे. गेल्या वर्षी त्यांनी रत्नागिरीहून आंबा, नारळ, जांभूळ, अंजीर, सीताफळ अशी ७० फळझाडे आणून शेतात शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केली होती. एक वर्षात त्याची चांगली वाढ होऊन फळेही लागली आहेत. त्यामुळे त्यांची शेती पाहण्यासाठी पंचक्रोषीतील शेतकरी येत आहेत.

दरम्यान, काही शेतकऱ्यांनी फळांची रोपे उपलब्ध करून देण्याबरोबर मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे उद्धव सरवदे यांनी जवळपास दोन हजार झाडे रत्नागिरीहून आणून लोकसहभागातून नाममात्र दरात उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. त्यासाठी त्यांना रोहित कोतवाड, प्रशांत तेरकर, राजू हुडे, नवनाथ खंदाडे, सुनील होळकर, नवनाथ झुटे, रामदास झुल्पे, हनुमंत पुजारी, सतीश होळकर, महादेव आडसकर, रामदास काळे यांनी सहकार्य केले.

===Photopath===

280621\img-20210613-wa0027.jpg

===Caption===

रेणापूरात फळझाडे वाटप करताना वृक्षप्रेमी उद्धव सरवदे व शेतकरी

Web Title: Distribution of two thousand fruit saplings in Renapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.