हाळी शाळेत गणवेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:35+5:302021-03-13T04:35:35+5:30
अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फारुख शेख होते. यावेळी माजी सभापती कल्याण पाटील, चेअरमन अशोकराव माने, सरपंच मायाताई गायकवाड, ...

हाळी शाळेत गणवेश वाटप
अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फारुख शेख होते. यावेळी माजी सभापती कल्याण पाटील, चेअरमन अशोकराव माने, सरपंच मायाताई गायकवाड, उपसरपंच राजकुमार पाटील, केंद्रप्रमुख काशीम शेख, मुख्याध्यापक रमाकांत मोटे, ग्रामविकास अधिकारी मनोहर जानतिने, शेषेराव माने आदी उपस्थित होते. शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या २३६ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्या संगिता बच्चेवार यांच्याकडून विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य माधव धनुरे, मिरा शाहीर, संगिता बच्चेवार, मथुरा कांबळे, सुरेखा शिंदे, उपेंद्र काळेगोरे, सिद्धार्थ मसुरे, गौतम कांबळे, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रकाश बच्चेवार आदींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मिनाक्षी शिंदे यांनी केले. यशस्वीतेसाठी इलियास बेग, रेश्मा शेख, एस.टी. राजे यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.