क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:14 IST2021-01-10T04:14:44+5:302021-01-10T04:14:44+5:30

यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, सुरज पाटील, ॲड. शंकर भुरकापल्ले, कोंडिबा पडोळे, बळीराम गोरे यांची उपस्थिती होती. येथील ...

Distribution of prizes to the winners of cricket tournaments | क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, सुरज पाटील, ॲड. शंकर भुरकापल्ले, कोंडिबा पडोळे, बळीराम गोरे यांची उपस्थिती होती. येथील महेश बिलपट्टे यांच्या पुढाकारातून दरवर्षी प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या स्पर्धेत दहा संघांनी सहभाग नोंदविला होता. अंतिम सामना सायली क्रिकेट क्लब व सह्याद्री क्रिकेट क्लब यांच्यात होऊन सायली क्रिकेट क्लब हा विजेता ठरला. सह्याद्री उपविजेता ठरला. आ. बाबासाहेब पाटील यांच्या वतीने ३१ हजाराचे प्रथम पारितोषक व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक ॲड. शंकर भुरकापल्ले यांच्या वतीने १७ हजार ७७७ रुपये व सन्मानचिन्ह तर तृतीय पारितोषिक के.एन. पडोळे यांच्या वतीने ७ हजार ७७७ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले.

कॅप्शन : अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद येथे आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सायली क्रिकेट क्लबला प्रथम पारितोषिक देण्यात आले.

Web Title: Distribution of prizes to the winners of cricket tournaments