ग्रामपंचायतकडून घरोघरी मास्क, सॅनिटायझर वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST2021-05-08T04:20:05+5:302021-05-08T04:20:05+5:30
गावातील ७ आशा कार्यकर्ती यांना मास्क आणि सॅनिटायझरचे बॉक्स वितरण करण्यास देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन गुरमे, भगवान ...

ग्रामपंचायतकडून घरोघरी मास्क, सॅनिटायझर वाटप
गावातील ७ आशा कार्यकर्ती यांना मास्क आणि सॅनिटायझरचे बॉक्स वितरण करण्यास देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन गुरमे, भगवान भालेराव, सुप्रिया कांबळे, विजयकुमार वाघमारे, ग्रामविकास अधिकारी एच. बी.चलमले आदी उपस्थित होते .
हरंगुळ बु.येथे जवळपास ११ हजार लोकसंख्या असल्याने ७ आशा कार्यकर्ती यांच्या हस्ते घराघरात जाऊन वाटप केले जात आहे. हरंगुळ बु. हे गाव विस्तारित असून, सहा ते सात वेगवेगळे नगरं आहेत. त्यामुळे सदर साहित्य वाटपासाठी पाच दिवस लागतील, असे सरपंच सूर्यकांत सुडे यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हरंगुळ बु. ग्रामपंचायत सतर्क असून, ११ हजार लोकसंस्था असलेल्या या गावात केवळ २० जण कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी १२ गृहविलगीकरण तर ८ दवाखान्यात आहेत. लोकसंख्येच्या मानाने कोरोनाचा फैलाव रोखण्यास ग्रामपंचायतला यश आले आहे.