शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २९ गावांतील दिव्यांगांना साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST2021-03-29T04:13:24+5:302021-03-29T04:13:24+5:30

लातूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक अधिकारता योजनेंतर्गत तालुक्यातील दिव्यांगांना दिव्यांग साहित्याचे एकत्र वाटप करण्यात ...

Distribution of literature to the disabled in 29 villages of Shirur Anantpal taluka | शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २९ गावांतील दिव्यांगांना साहित्य वाटप

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २९ गावांतील दिव्यांगांना साहित्य वाटप

लातूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक अधिकारता योजनेंतर्गत तालुक्यातील दिव्यांगांना दिव्यांग साहित्याचे एकत्र वाटप करण्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका उद्भवत असल्यामुळे कोरोनाच्या नियमावलीचे पालन व्हावे, यासाठी शिरूर अनंतपाळ पंचायत समितीच्या वतीने घरपोच दिव्यांग साहित्याचे वाटप करण्याचे नियाेजन करण्यात आले. यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने, विस्तार अधिकारी दिनकर व्होट्टे यांनी नियोजन करून २९ गावांतील दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंदराव चिलकुरे, पंचायत समितीचे सभापती डाॅ. नरेश चलमले, उपसभापती उद्धवराव गायकवाड यांच्या उपस्थितीत घरपोच लाभ देण्यात आला.

या गावांतील लाभार्थ्यांना लाभ...

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २९ गावांतील दिव्यांगांना घरपोच दिव्यांग साहित्य वाटपाचा लाभ देण्यात आला. यामध्ये शिरूर अनंतपाळ, दैठणा, डोंगरगाव (बो), बेलनाळवाडी, अकुंलगा (स), बाकली, जोगाळा, थेरगाव, शिवपूर, आनंदवाडी, बोळेगाव (बु.), येरोळ, कांबळगा, तळेगाव (बो), राणी अंकुलगा, धामणगाव, शेंद, बिबराळ, उजेड, साकोळ, लक्कडजवळगा, भिंगोली, होनमाळ, अजनी (बु.), उमरदरा, सुमठाणा, कारेवाडी, आरी, गणेशवाडी या गावांचा समावेश आहे.

साहित्याचे वाटप...

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथे दिव्यांगांना साहित्याचे वाटप झाले. यावेळी जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंदराव चिलकुरे, सरपंच लक्ष्मीबाई बिरादार, उपसरपंच सीताराम पाटील, प्रशांत पाटील, योगेश बिरादार, ग्रामसेवक अनिल जाधव.

Web Title: Distribution of literature to the disabled in 29 villages of Shirur Anantpal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.