गरजू दृष्टिबाधितांना मोफत बोलक्या घड्याळाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST2021-03-22T04:18:07+5:302021-03-22T04:18:07+5:30
नॅब, लातूर आणि रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझनतर्फे मागील काही वर्षांपासून समाजातील गरजू आणि गरीब व्यक्तींना विविध सामाजिक उपक्रमांतर्गत ...

गरजू दृष्टिबाधितांना मोफत बोलक्या घड्याळाचे वाटप
नॅब, लातूर आणि रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझनतर्फे मागील काही वर्षांपासून समाजातील गरजू आणि गरीब व्यक्तींना विविध सामाजिक उपक्रमांतर्गत मदत केली जाते. मागील वर्षीच्या दिवाळीला प्रत्येकाला एक हजाराची आर्थिक मदत देण्यात आली, तसेच गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप, मोबाइलचे वाटप असे विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील दृष्टिबाधितांना मोफत बोलकं घड्याळ देण्यात येणार आहे. त्यासाठी दृष्टिबाधितांनी अर्ज नॅब कार्यालय, आशीर्वाद बिल्डिंग, सिग्नल कॅम्प, लातूर येथे संपर्क साधावा.
अर्जासोबत आधार कार्ड झेरॅाक्स, शंभर टक्के दृष्टिबाधित असल्याचे शासकीय डॉक्टरचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. या घड्याळीचे वैशिष्ट म्हणजे याला एक विशिष्ट बटण दाबल्यानंतर असलेली वेळ ही बोलून दाखविली जाते. त्यामुळे दृष्टिबाधितांना वेळ कळते. या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नॅबचे अध्यक्ष डॉ.विजयभाऊ राठी, रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझनचे अध्यक्ष डॉ.मल्लिकार्जुन हुलसुरे, सचिव नीळकंठ स्वामी, प्रोजेक्ट चेअरमन माधव गोरे, डॉ.गोपीकिशन भराडिया, डॉ.संजय गवई, डॉ.गुणवंत बिरादार, बी.पी. सूर्यवंशी, राहुल बेलकुंदे व मुकुंद कुलकर्णी यांनी केले.