जिल्ह्यातील चार लाख रेशनकार्ड धारकांना धान्याचे वितरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:21 IST2021-04-28T04:21:04+5:302021-04-28T04:21:04+5:30

एकूण रेशनकार्ड धारकांची संख्या - ४,०३,३७३ एपीएल - ६०,१९२ प्राधान्य कुटुंब - ३,०२,७६६ अंत्योदय - ४१,४१५ गहू आणि तांदळाचा ...

Distribution of foodgrains to four lakh ration card holders in the district | जिल्ह्यातील चार लाख रेशनकार्ड धारकांना धान्याचे वितरण सुरू

जिल्ह्यातील चार लाख रेशनकार्ड धारकांना धान्याचे वितरण सुरू

एकूण रेशनकार्ड धारकांची संख्या - ४,०३,३७३

एपीएल - ६०,१९२

प्राधान्य कुटुंब - ३,०२,७६६

अंत्योदय - ४१,४१५

गहू आणि तांदळाचा समावेश...

रेशनकार्ड धारकांना शासनाच्या वतीने गहू आणि तांदूळ दिला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसारच वितरण होणार असून, एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

गावस्तरावर वाटप सुरू

शासनाच्या आदेशानुसार गावस्तरावर रेशन धान्यपुरवठा करण्यात आला आहे. प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात झाली आहे. रेशन दुकानदारांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

योजनेमुळे अनेकांना मिळाला आधार...

सध्या हाताला काम नाही. शासनाच्या वतीने गहू आणि तांदूळ मिळाले आहेत. त्यामुळे आधार मिळाला आहे. संचारबंदीमुळे हातांना काम नसल्याने आर्थिक संकट आहे. त्यात कुटुंबाचा गाडा कसा चालविणार असा प्रश्न होता. गहू आणि तांदूळ मिळाल्याने काही दिवसांसाठी दिलासा मिळाला.

- राणी ढोले

संचारबंदीमुळे व्यवसाय ठप्प आहे. त्यातच उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न होता. मात्र, रेशनकार्डवर गहू आणि तांदूळ मिळाल्याने काही दिवसांची सोय झाली आहे. शासनाने काेरोनाचे संकट संपेपर्यत पात्र लाभार्थ्यांना मोफत धान्याचा लाभ द्यावा.

- महेश पाटील

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कामाला जाणे अवघड झाले आहे. संचारबंदी असल्याने काम मिळत नाही. घरचा प्रपंच कसा चालविणार असा प्रश्न होता. गहू आणि तांदूळ मिळाले असले तरी डाळी, तेल मिळालेले नाही.

- अशोक जाधव

Web Title: Distribution of foodgrains to four lakh ration card holders in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.