अन्नधान्याच्या किटचे कलावंतांना वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST2021-06-05T04:14:58+5:302021-06-05T04:14:58+5:30
छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्याची मागणी लातूर : आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाचे काम ...

अन्नधान्याच्या किटचे कलावंतांना वाटप
छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्याची मागणी
लातूर : आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाचे काम २६ जूनपूर्वी पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी लोकराजा छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीच्यावतीने ॲड. उदय गवारे यांनी केली आहे.
तत्कालीन नगर परिषदेने छत्रपती शाहू महाराजांचा शाहू चौक येथे अर्धाकृती पुतळा बसविला होता. त्यानंतर जनतेच्या मागणीवरून पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा निर्णय मनपाने घेतला. त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून सुरू करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी स्मारकाचे काम सुरू करण्यात आले. परंतु, या कामात दिरंगाई होत आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर चबुतऱ्याच्या कामाला गती मिळाली. परंतु, अद्याप पुतळा बसविण्यात आलेला नाही. लवकरात लवकर पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी कृती समिती आणि विविध संघटनांनी केली आहे. येत्या २६ जूनला छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी लातूर मनपाने शाहू महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा करावा, अशी मागणी पालकमंत्री अमित देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल यांच्याकडे करण्यात आली आहे.