महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फेसशिल्डचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:20 IST2021-05-07T04:20:27+5:302021-05-07T04:20:27+5:30
कोरोना नियमांचे उल्लंघन ; बारा जणांवर गुन्हा लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ...

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फेसशिल्डचे वाटप
कोरोना नियमांचे उल्लंघन ; बारा जणांवर गुन्हा
लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध घातले आहेत. मात्र या निर्बंधाचे उल्लंघन अनेकांकडून होत आहे. शिरूर अनंतपाळ परिसरातील निटूर आऊट पोस्ट अंतर्गत उल्लंघन केलेल्या बारा जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले. निटूर बसस्थानक परिसरात पाहणी दरम्यान सदर उल्लंघन उडकीस आले. त्यानुसार कारवाई झाली.
अहमदपूर तालुक्यातील खंडाळीत रक्तदान
लातूर : पालकमंत्री अमित देशमुख यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील युवकांनी एकत्र येऊन रक्तदान करण्याचा संकल्प केला. हनुमान मंदिर येथे झालेल्या या शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले. जनार्दन पौळ, शंकरराव शेळके, माधवराव माने, अशोक कांडगिरे, उमदार मामू, ऋषिकेश पौळ, राजाभाऊ पौळ, संदीप खोमणे आदींची यावेळी उपस्थिती होती.
उदगीर बाजार समितीत लसीकरण
लातूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून शेतमालाच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू आहे. परंतु, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित आंतर पाळणे गरजेचे आहे. शिवाय, लसीकरण मोहीम राबविण्याची ही गरज आहे. त्यानुसार बाजार समितीत लसीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यमंत्री बनसोडे यांनी ही मागणी तत्वत: मान्य केली असून, राज्याच्या पणन व सहकार मंत्र्यांकडे या मागणीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
लातूर : विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. गांधी चौक, शिवाजी चौक, विवेकानंद चौक, लातूर एमआयडीसी, लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. बुधवारी अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव हे स्वत: रस्त्यावर उतरले होते. गांधी चौक व शिवाजी चौकातील रस्त्यावर थांबून त्यांनी येणाऱ्या-जाणाऱ्यांची चौकशी केली. वाहनांची तपासणी केली. यावेळी मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.
अंत्यविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप
लातूर : अंत्यविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रणांगण मित्र मंडळाच्या वतीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यात मेडिस्ट्रिम वेकोरायझर मशीन, मास्क, सॅनिटायझर आदी साहित्यांचे वाटप उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. मनपाचे स्वच्छता कर्मचारी जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. त्यांनाही महापौर विक्रांत गोजमगुंडे, नगरसेविका शोभा पाटील, आनंद गायकवाड, सुमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मंडळाचे सदस्य त्रिंबक स्वामी, ॲड. रोहित पाटील, ओमप्रकाश जोशी, बालाजी कांबळे, रामहरी ससाणे, राहुल साळुंके, संजयकुमार साळवे, अजित बिराजदार, महेश भोसले, विशाल पवार, सौरभ खरोसेकर आदींची उपस्थिती होती.