मनपाच्यावतीने ९३१ दिव्यांगांना उपकरणांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST2021-03-28T04:18:25+5:302021-03-28T04:18:25+5:30
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रप्रमुख संवेदना प्रकल्पाचे प्रमुख सुरेश पाटील यांच्या पुढाकारातून दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात आलेल्या शिबिरांमधून लाभार्थ्यांची निवड करण्यात ...

मनपाच्यावतीने ९३१ दिव्यांगांना उपकरणांचे वितरण
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रप्रमुख संवेदना प्रकल्पाचे प्रमुख सुरेश पाटील यांच्या पुढाकारातून दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात आलेल्या शिबिरांमधून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. मूकबधिर, अंध, शारीरिक अपंगत्व असणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार लागणारे सहायता उपकरणे अलिमको या संस्थेतर्फे उपलब्ध करण्यात आले आहे.
दिव्यांग व्यक्तींना अत्याधुनिक श्रवणयंत्र, तीनचाकी सायकल, स्वयंचलित तीनचाकी सायकल, मोबाईल फोन, अत्याधुनिक काठी अशाप्रकारच्या साहित्याचा समावेश आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सर्व साहित्य मनपाच्यावतीने घरपोच वितरित करण्याचा सूचना केल्या. यावेळी नगरसेवक सचिन बंडापल्ले, आयुब मणियार, रघुनाथ मदने, गोरोबा लोखंडे यांच्यासह महानगरपालिकेचे महिला व बाल कल्याण अधिकारी वडगावे, आस्थापना विभागप्रमुख रमाकांत पिडगे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती होती.
कॅप्शन : महापालिकेच्यावतीने साहित्याचे वाटप...
लातूर शहरातील लाभार्थ्यांना दिव्यांग सहायता उपकरणांचे वाटप महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आहे. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल, विरोधी पक्षनेते दीपक सूळ, सुरेश पाटील यांची उपस्थिती होती.