जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST2021-04-12T04:17:49+5:302021-04-12T04:17:49+5:30

लातूर : जागतिक महिला दिनानिमित्त सर फाउंडेशन आणि वुमन टीचर्स फोरमच्या वतीने जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. ...

Distribution of District Level Narishakti Award | जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्काराचे वितरण

जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्काराचे वितरण

लातूर : जागतिक महिला दिनानिमित्त सर फाउंडेशन आणि वुमन टीचर्स फोरमच्या वतीने जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. या पुरस्काराचे वितरण मंगळवारी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.

यावेळी लातुर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, डायटच्या अधिव्याख्यात्या डॉ. भागीरथी गिरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी, हेमाताई शिंदे, सर फाउंडेशनचे सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, राजकिरण चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नीता मोरे, कमल लहाने, माधुरी वलसे, स्वाती कांबळे, मीना देवकत्ते, कांता रायवाड, कांता उदावंत, वंदना कांबळे यांचा नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शांता लोहारे कौशल्या पवार, मंगल डोंगरे, प्रभावती मोतीपवळे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमास जिल्हा समन्वयिका शोभा माने, कमलाकर सावंत, प्रमोद हुडगे, संतोष सोनवळे, डायटचे विषय सहायक सतीश सातपुते, दीपक क्षीरसागर, बालाजी मोतेवाड यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सुशीलकुमार पांचाळ, सटवाजी कांबळे,धनंजय गुडसूरकर, किरण साकोळे, पांडुरंग यलमटे, भारत सोनवणे, संगीता कानडे, सुवर्णा बिराजदार, कविता सूर्यवंशी, रंजिता सोमावार यांनी परिश्रम घेतले.

* * * *संयोजक सर फाउंडेशन टीम लातूर*.

Web Title: Distribution of District Level Narishakti Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.