८ हजार ७९७ दिव्यांगांना घरपाेच कृत्रिम साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:17 IST2020-12-08T04:17:07+5:302020-12-08T04:17:07+5:30
जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले, १० डिसेंबर राेजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात ऑनलाइनद्वारे हाेणार असून, या कर्यक्रमात प्रातिनिधिक ...

८ हजार ७९७ दिव्यांगांना घरपाेच कृत्रिम साहित्य वाटप
जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले, १० डिसेंबर राेजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात ऑनलाइनद्वारे हाेणार असून, या कर्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात ३० दिव्यांगांना कृत्रिम अवयव व साहित्य वाटप हाेणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, समाज कल्याण विभागाने याेग्य ती दक्षता घ्यावी, असे त्यांनी सूचित केले. संबंधित अधिकाऱ्यांनी एकमेकांत समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात पाच हजार अस्थिव्यंग...
लातूर जिल्ह्यातील ८ हजार ७९७ लाभार्थ्यांपैकी तब्बल ४ हजार ८६९ अस्थिव्यंग आहेत. तर मूकबधीर - १ हजार ९११, मतिमंद - ९३२ आणि अंध १ हजार ८५ लाभार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये अहमदपूर - ७५७, चाकूर ५३४, रेणापूर - ३८६, लातूर - २ हजार ६८५, औसा - ९८४, उदगीर - ८४१, देवणी - ४१२, जळकाेट - ३७५, निलंगा - १ हजार ६०८, शिरुर अनंतपाळ तालुक्यात २१५ लाभार्थी संख्या आहे.