दिव्यांगांना कृत्रिम साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:33 IST2021-02-06T04:33:49+5:302021-02-06T04:33:49+5:30

अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती गंगासागर जाभाडे होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य अशोक केंद्रे, मुद्रिका भिकाणे, उपसभापती बालाजी गुट्टे, गटविकास ...

Distribution of artificial materials to the disabled | दिव्यांगांना कृत्रिम साहित्य वाटप

दिव्यांगांना कृत्रिम साहित्य वाटप

अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती गंगासागर जाभाडे होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य अशोक केंद्रे, मुद्रिका भिकाणे, उपसभापती बालाजी गुट्टे, गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, शिवानंद हेंगणे यांची उपस्थिती होती.

दिव्यांगांसाठी गत जानेवारीत शिबिर घेण्यात आले होते. त्यात तालुक्यातील १ हजार १३४ जणांनी नोंदणी केली होती. नोंदणीनुसार पहिल्या टप्प्यात शहर व जिल्हा परिषद अंतर्गत दिव्यांग साहित्याचे वाटप करण्यात आले. अहमदपुरातील ३२० जणांना, खंडाळी- ८७, आंधोरी- ७३, सावरगाव रोकडा-५६, किनगाव- ८४, शिरूर ताजबंद- ७३, हाडोळती- ६४ असे एकूण ७५७ लाभार्थी आहेत. यामध्ये अंध ७७, अस्थिव्यंग ३९२, कर्णबधिर १८२, मतिमंद १०६ जणांचा सामावेश आहे.

शासनामार्फत भारतीय कृत्रिम अंगनिर्माणच्या वतीने तीन चाकी सायकल, कृत्रिम अवयव, चाकी खुर्ची, कुबडी, श्रवण यंत्र, ब्रेल कीट, स्मार्ट फोन असा साहित्य पुरवठा करण्यात आला. यावेळी निवृत्ती कांबळे, हुसेन मनियार, प्रशांत भोसले, गोपाळ कानवटे, अनिस कुरेशी, भगवान ससाणे, अशोक सोनकांबळे, आदींची उपस्थिती होती.

Web Title: Distribution of artificial materials to the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.