महिला बचत गटांकडून हाेणार २०० निर्धूर चुलींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:16+5:302020-12-30T04:26:16+5:30
शिरुर ताजबंद येथील लोकसंचलित साधन केंद्राअंतर्गत २८ गावात ३५० महिला बचत गट आहेत. या गटांमध्ये ४ हजार ८५० महिला ...

महिला बचत गटांकडून हाेणार २०० निर्धूर चुलींचे वाटप
शिरुर ताजबंद येथील लोकसंचलित साधन केंद्राअंतर्गत २८ गावात ३५० महिला बचत गट आहेत. या गटांमध्ये ४ हजार ८५० महिला सदस्यांचा सहभाग आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने बचत गटात ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या महिलांना स्वयंपाकगृहात धुराचा त्रास हाेताे, ताे हाेता कामा नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याच उपक्रमातून १ हजार निर्धूर चुली मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २०० चुलींचे वाटप करण्यात आले आहे. अहमदपूर तालुक्यातील वळसंगी येथील महिला बचत गटातील महिलांना ५० सदस्य, कुमठा (बु) येथे ५० महिला सदस्य, उमरगा कोर्ट २७, तेलगांव १९ सदस्य, चोबळी येथे ५० महिला सदस्यांना चुलीचे वाटप करण्यात आले आहे. सदरील गावात एकूण २०० चुलींचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती शाखा व्यवस्थापक मीरा भोसले यांनी दिली. दररोज एक गाव याप्रमाणे या चुलींचे वाटप केले जात आहे. यासाठी सहयोगिनी गोदावरी पवार, सरिता हंडे या अधिक परिश्रम घेत आहेत.