वीजबिलात सवलत द्या; अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:33 IST2021-02-06T04:33:43+5:302021-02-06T04:33:43+5:30
विमा कंपन्यांची भूमिका नकारात्मक सरकारने ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. परंतु, या घोषणेकडे त्यांचे आता दुर्लक्ष ...

वीजबिलात सवलत द्या; अन्यथा आंदोलन
विमा कंपन्यांची भूमिका नकारात्मक
सरकारने ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. परंतु, या घोषणेकडे त्यांचे आता दुर्लक्ष झाले आहे. गरिबांची पिळवणूक करणारे हे सरकार आहे. महसूल विभागाने अतिवृष्टीतील नुकसानीचा पंचनामा केला. परंतु, विमा कंपन्या महसूलचा सर्वे मानायला तयार नाहीत. विमा देण्याबाबत कंपन्यांची भूमिका सकारात्मक नाही. विमा कंपन्या, सरकार आणि कृषी खात्यात समन्वय नाही, असा आरोपही विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केला.
जेलभरो आंदोलन करणार : आ. संभाजी पाटील-निलंगेकर
राज्य सरकारचा आंधळा कारभार सुरू आहे. शेतकरी आणि सामान्य जनता त्यात होरपळत आहे. राजाच आंधळा असल्यामुळे प्रजेला अंधारात वावरावे लागत आहे. वीजबिलांबाबत सरकारने आठ-दहा दिवसांत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल. जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रास्ताविकात माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिला.