जिल्ह्यात शस्त्रबंदी, जमावबंदी आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:14 IST2021-05-03T04:14:52+5:302021-05-03T04:14:52+5:30

शेतातून बैलगाडी घेऊन जाण्यावरून मारहाण लातूर : तुम्ही आमच्या शेतातून बैलगाडी घेऊन जाऊ नका, असे म्हटल्याने फिर्यादी व फिर्यादीच्या ...

Disarmament order issued in the district | जिल्ह्यात शस्त्रबंदी, जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी, जमावबंदी आदेश जारी

शेतातून बैलगाडी घेऊन जाण्यावरून मारहाण

लातूर : तुम्ही आमच्या शेतातून बैलगाडी घेऊन जाऊ नका, असे म्हटल्याने फिर्यादी व फिर्यादीच्या मुलाला तसेच सुनेला दवणहिप्परगा शिवारात काठीने, चापटाने मारून शिवीगाळ केल्याची घटना घडली. याबाबत नागम्माबाई बाबुराव मोळकिरे (रा. दवणहिप्परगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माधव गुरुनाथ बिरादार व अन्य तिघांविरुद्ध देवणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उदगीर येथील दुचाकीची चोरी

लातूर : उदगीर येथील शाहूनगर येथे पार्किंग केलेल्या (एमएच २४ बीएफ ३४२१) या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना ३० मे रोजी घडली. याबाबत अमृतराव नरसिंगराव देशपांडे (रा. सताळा बु., ता. उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी ; गुन्हा दाखल

लातूर : स्वत:च्या ताब्यातील वाहनामध्ये ५० टक्के क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जांब चौक जळकोट येथे कारवाई करण्यात आली. याबाबत पोना. सूर्यकांत राम धाकपाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनेश विठ्ठल मुंडे (रा. लोहा, जि. नांदेड) यांच्याविरुद्ध जळकोट पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. चिमनदरे करीत आहेत.

दरम्यान, ५० टक्के क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करीत असताना पाटोदा (बु.) येथेही एका वाहनधारकावर कारवाई करण्यात आली. याबाबत पोउपनि. विश्वनाथ विठ्ठल बोईनवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (एमएच २४ बीक्यू ३४७४) या क्रमांकाच्या चालकाविरुद्ध जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. मिटकरी करीत आहेत.

कारची दुचाकीला धडक ; गुन्हा दाखल

लातूर : लातूर ते नांदेड रोडने तोंडार पाटी येथे भरधाव वेगातील (एमएच १२ पीसी २१८७) या क्रमांकाच्या कारचालकाने फिर्यादीचा (एमएच २४ एयु २०६२) या क्रमांकाच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. कमरेचे व पाठीमागचे हाड फ्रॅक्चर झाले. याबाबत ओमप्रकाश हनुमानदास चांडक (रा. बालाजी मंदिरजवळ लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (एमएच १२ पीसी २१८७) या क्रमांकाच्या कारचालकाविरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सपोसई. येरबागे करीत आहेत.

Web Title: Disarmament order issued in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.