डिगोळ शिवारात बांधावर भरली शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:16 IST2021-01-02T04:16:37+5:302021-01-02T04:16:37+5:30
या शेतीशाळेमध्ये हरभरा पिकावर हाेणाऱ्या कीड आणि रोगावर कसे नियंत्रण करता येते, शेतकऱ्यांना उन्हाळी सोयाबीन पिकाची लागवड कशी करावी, ...

डिगोळ शिवारात बांधावर भरली शेतीशाळा
या शेतीशाळेमध्ये हरभरा पिकावर हाेणाऱ्या कीड आणि रोगावर कसे नियंत्रण करता येते, शेतकऱ्यांना उन्हाळी सोयाबीन पिकाची लागवड कशी करावी, याबाबत माहिती देण्यात आली. तर आगामी खरीप हंगामामध्ये सोयाबीन बियाणाचा तुटवडा कमी होईल, असे शिरुर अनंतपाळ तालुका तंत्रव्यवस्थापक बी. यू. तिवडे यांनी सांगितले. हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापन कसे करावे, पिकावर सध्याला हिरवी आळी मोठ्या प्रमाणात पडल्याचे दिसून येत आहे. या अळींचा प्रादुर्भाव नाहीसा करण्यासाठी काय करावे, याबाबत कृषी सहायक संभाजी सूर्यवंशी यांनी सांगितले.
शेतीशाळेला बालाजी वाडकर, लहू बिरादार, अशोकराव पाटील, तुकाराम वाडकर, ज्ञानोबा बिरादार, प्रमोद पाटील, नामदेव ककुलै, रमेश वाडकर, हरी वाडकर, महेपती वाडकर, संजय बिरादार, आशोक बिरादार, प्रमोद बिरादार, संजय कांबळे, रावसाहेब बिरादार, बळवंत बिरादार यांची प्रमुख उपस्थिती हाेती.