पीक विम्याच्या रकमेत तफावत, विभागीय आयुक्तांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:26 IST2021-02-27T04:26:12+5:302021-02-27T04:26:12+5:30
शंकरराव पाटील तळेगावकर यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. देवणी पंचायत समितीत आयुक्त कार्यालयाने तपासणी अहवालाचे वाचन व सुंदर ...

पीक विम्याच्या रकमेत तफावत, विभागीय आयुक्तांकडे धाव
शंकरराव पाटील तळेगावकर यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देवणी पंचायत समितीत आयुक्त कार्यालयाने तपासणी अहवालाचे वाचन व सुंदर माझे कार्यालय अभियानअंतर्गत पाहणी करण्यात आली. तेव्हा उपायुक्त वैशाली रसाळ यांना हे निवेदन देण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन २०२०- २१ चा पीकविमा भरलेला असून पीकविम्याच्या नुकसान भरपाईपोटी मिळणारी रक्कम एकाच गावातील काही शेतकऱ्यांना हेक्टरी १७ हजार ४०० रुपये तर शेजारच्या शेतकऱ्याला सारख्याच पिकाच्या नुकसानीपोटी हेक्टरी ५०० रुपये मिळाले आहेत. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. याकडे संबंधित विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधीकडे चौकशी केली असता दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रारी पोर्टलवर कराव्यात, असे म्हटले जात आहे. अशिक्षित शेतकरी ऑनलाईन तक्रार दाखल करु शकत नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी सभापती सत्यवान कांबळे, बाळासाहेब बिरादार, सोमनाथ बोरोळे आदी उपस्थित होते.