‘ढेरपाेटे’ पाेलीस वाढले, अनिश्चित वेळेत कसे राखणार आराेग्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST2021-09-08T04:25:51+5:302021-09-08T04:25:51+5:30

कर्तव्यावर असलेल्या पाेलीस दलातील कर्मचाऱ्यांना आपले आराेग्य सांभाळण्याची माेठी कसरत करावी लागत आहे. कामाचा अतिरिक्त ताण आणि त्यातच आराेग्याचे ...

‘Dherapate’ Paelis increased, how to maintain health indefinitely! | ‘ढेरपाेटे’ पाेलीस वाढले, अनिश्चित वेळेत कसे राखणार आराेग्य !

‘ढेरपाेटे’ पाेलीस वाढले, अनिश्चित वेळेत कसे राखणार आराेग्य !

कर्तव्यावर असलेल्या पाेलीस दलातील कर्मचाऱ्यांना आपले आराेग्य सांभाळण्याची माेठी कसरत करावी लागत आहे. कामाचा अतिरिक्त ताण आणि त्यातच आराेग्याचे प्रश्न यामुळे अनेक कर्मचारी बेजार आहेत. आता अशामध्ये २५० रुपयांच्या भत्त्यासाठी बाॅडी मास इंडेक्स सर्टिफिकेट सादर करावे लागत आहे. रात्रपाळी आणि दिवसपाळीसाठी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाेटाचा घेर वाढताे. यातून वयाच्या चाळिशीनंतर मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारही जडत आहेत. पूर्वी खासगी रुग्णालयातून फिट प्रमाणपत्र मिळवून ते सादर करता येत हाेते. आता मात्र, हे प्रमाणपत्र शासकीय रुग्णालयातून मिळवावे लागणार आहे.

अर्जासाठी फेब्रुवारी...

दरवर्षी पाेलीस कर्मचाऱ्यांना बाॅडी मास इंडेक्स सर्टिफिकेट सादर करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याची डेडलाईन देण्यात आली आहे. ज्यांनी प्रमाणपत्र सादर केले, त्यांनाच २५० रुपयांचा भत्ता दिला जाताे.

जेवणालाही वेळ मिळत नाही...

मी लातूर जिल्हा पाेलीस दलात गत २५ वर्षांपासून कार्यरत आहे. दैनंदिन कामकाजाचा ताण-तणाव आणि वेळी-अवेळी हाेणारे जेवण यामुळे आराेग्याचे प्रश्न निर्माण हाेतात. रात्रपाळीच्या कर्मचाऱ्याला सकाळी उठून मैदानावर जाणे अशक्य असते. अशावेळी नियमित व्यायामही करता येत नाही.

- एक कर्मचारी.

महाविद्यालयीन जीवनात मी पहाटेच्यावेळी नियमित व्यायाम करत हाेताे. व्हाॅलिबाॅल खेळत हाेताे. दरम्यान, आराेग्यही उत्तम राखता आले. आता अलीकडे कामाचा वाढलेला अतिरिक्त ताण आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे पाेटाचा घेर वाढला आहे. चालतानाही आता दम लागत आहे. यातून आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

- एक कर्मचारी

कसे राखणार आराेग्य...

पाेलीस दलातील बहुतांश पाेलीस कर्मचाऱ्यांना ना वेळेवर झाेपता येते, ना वेळेवर जेवण करता येते. सर्वच वेळा अनिश्चित असल्याने आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शिवाय, दरवर्षी फिट प्रमाणपत्र सादर करावे. २५० रुपयांच्या भत्त्यासाठी आराेग्य कसे राखायचे... असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.

२५० रुपयांचा भत्ता...

पाेलीस दलातील सर्वच कर्मचाऱ्यांना फिट प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सूचित केले जाते. यासाठी फेब्रुवारी महिनाअखेर वेळ देण्यात आली आहे. दरवर्षी हे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. ज्यांनी प्रमाणपत्र सादर केले आहे, त्यांनाच हा भत्ता दिला जाताे.

- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर

Web Title: ‘Dherapate’ Paelis increased, how to maintain health indefinitely!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.